सुट्ट्यांमुळे निर्णय
नाशिक : प्रतिनिधी
दिवाळी व शालेय सुट्ट्यांच्या अनुषंगाने सिटीलिंकतर्फे शुक्रवारपासून (दि.17) शाळा, महाविद्यालयांना लागलेल्या सुट्ट्या लक्षात घेता सिटीलिंकने नियमित बसेसच्या नियोजनात बदल केला आहे. 19 ते 21 ऑक्टोबरदरम्यान सकाळ सत्रात रविवारच्या सुट्टीच्या नियोजनानुसार बसेस चालविण्यात येणार आहेत. दुपारा सत्रात नियमित चालविण्यात येतील.
सुट्ट्यांच्या कालावधीत प्रवासी संख्येत घट होते. त्यानुसार बसेसचे नियोजन केले जाते. 22 ऑक्टोबरपासून नियमित सिटीलिंक बसेस चालवल्या जातील. शाळा, महाविद्यालयांच्या मागार्ंवरील व प्रवासी संख्या जास्त असणार्या मार्गांवर शाळा, महाविद्यालयांच्या सुट्टीच्या कालावधीत खालीलप्रमाणे नियोजन केले आहे. सिटीलिंकच्या बसफेर्या कमी केल्याची प्रवाशांनी नोंद घ्यावी. असे आवाहन सिटीलिंक प्रशासनाने केले आहे. यात तपोवन आगारातून मार्ग क्रमांक 131 निमाणी ते गिरणारे सद्यःस्थितीत सुरू असलेल्या आठ बसेसऐवजी चार बसेस धावतील. चार बसेसच्या माध्यमातून 30 मिनिटांनी
फेरी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मार्ग क्रमांक 102 निमाणी ते बारदान फाटामार्गे एचपीटी महाविद्यालय सद्यःस्थितीत सुरू असलेल्या सर्व चारही बसेस महाविद्यालयांना सुट्टी असल्याने बंद करण्यात येतील. मार्ग क्रमांक 146 निमाणी ते सिन्नर सध्या सुरू असलेल्या बसेसव्यतिरिक्त चार बसेस अतिरिक्त चालविण्यात येतील. दर दहा मिनिटांनी बसफेरी उपलब्ध असेल. मार्ग क्रमांक 152- नवीन सीबीएस ते पिंपळगाव सध्या सुरू असलेल्या बसेसव्यतिरिक्त चार बसेस अतिरिक्त चालविण्यात येतील. दर दहा मिनिटांनी बसफेरी उपलब्ध असेल. नाशिकरोड आगारातून मार्ग क्रमांक 221 (नाशिकरोड ते शिंगवे बहुलामार्गे विहितगाव), मार्ग क्रमांक 222 (नाशिकरोड ते शिंगवे बहुलामार्गे वाडीचे रान), क्रमांक 223 (नाशिकरोड ते शिंगवे बहुलामार्गे पिंपळगाव खांब), क्रमांक 231 (नाशिकरोड ते जेआयटी महाविद्यालयमार्गे सातपूर), क्रमांक 220 (नाशिकरोड ते मातोश्री महाविद्यालय), क्रमांक 264 (तपोवन ते आर्मी पब्लिक स्कूल), क्रमांक 264 ए (नाशिकरोड ते आर्मी पब्लिक स्कूल), अशा एकूण सात मार्गांवरील बसेस शाळा-कॉलेजला सुट्टी असल्याने या कालावधीत बंद करण्यात येतील. क्रमांक 210 नाशिकरोड ते दिंडोरी या मार्गावरील सध्या सुरू असलेल्या बसेसव्यतिरिक्त चार बसेस अतिरिक्त चालविण्यात येतील. दर दहा मिनिटांना बसफेरी उपलब्ध असेल. क्रमांक 202 नाशिकरोड ते बारदान फाटामार्गे एचपीटी महाविद्यालय सध्या सुरू असलेल्या आठऐवजी चार बसेस चालविण्यात येतील. चार बसेसच्या माध्यमातून दर 40 मिनिटांना फेरी उपलब्ध करून देण्यात आली आहे.सिटीलिंकचे सर्व पास केंद्र दि. 20 ते 23 ऑक्टोबरपर्यंत बंद राहतील.केटीएचएम महाविद्याल येथील पास केंद्र दि. 19 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरपर्यंत बंद राहील.