मनपाची तत्काळ कारवाई

व्यायाम यंत्रांवरील झाडाझुडपांची छाटणी

‘गांवकरी’ इम्पॅक्ट

वडाळगाव : प्रतिनिधी
दै. गांवकरी वृत्तपत्रात सोमवारी (दि.13 ऑक्टोबर) ‘उद्यान झाले कचर्‍याचे डेपो; प्रशासनाचे दुर्लक्ष!’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या बातमीची तत्काळ दखल घेत महापालिका प्रशासनाने त्वरित कारवाई केली आहे.
बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर केवळ एकाच दिवसात स्वच्छता विभागाने संबंधित उद्यान परिसरातील झाडाझुडपांची छाटणी व संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे. तसेच कचर्‍याची विल्हेवाट लावून व्यायाम यंत्रे नागरिकांच्या वापरासाठी पुन्हा खुली करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. महापालिकेच्या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत ‘गांवकरी’ वृत्तपत्राचे आभार मानले आहेत. अनेक दिवस दुर्लक्षित असलेल्या या जागेकडे प्रशासनाचे लक्ष वेधल्याबद्दल रहिवाशांनीही वृत्तपत्राचे कौतुक केले. प्रशासनाच्या त्वरित प्रतिसादामुळे आता परिसर पुन्हा एकदा स्वच्छ आणि सुशोभित दिसणार आहे. व्यायामप्रेमी नागरिक आणि सकाळी चालणारे नागरिक यांना आता मुक्तपणे व्यायाम करता येईल, याचे सर्वत्र समाधान व्यक्त केले
जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *