ऐन दिवाळीत कचर्‍याचे ब्लॅक स्पॉट वाढले

सिडको : विशेष प्रतिनिधी
ऐन दिवाळी सणाच्या अगोदर नवीन नाशिकमध्ये ठिकठिकाणी कचर्‍याचे ब्लॅक स्पॉट वाढल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. नागरिक तसेच वाहनचालकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
परिसरातील उत्तमनगर येथील बुद्ध विहाराच्या मागे मुख्य रस्त्यावर, फडोळ मळा ते अंबड गाव मुख्य रस्त्यालगत, उंटवाडी गावासमोरील सिटी लिंकच्या थांब्याजवळ, जुडीओ ते फडोळ मळा मुख्य रस्त्यावरील नाल्यालगत काही बेशिस्त नागरिक उघड्यावर कचरा टाकत असल्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
या समस्येकडे महापालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. महापालिकेने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन उघड्यावर कचरा टाकणार्‍या नागरिकांवर कारवाई करावी व येथील कचरा त्वरित साफ करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *