तिन्ही दलांच्या समन्वयामुळे पाकने पत्करली शरणागती

आयएनएस विक्रांतवर नौदलासोबत मोदींची दिवाळी

पणजी :
संपूर्ण देश दिवाळीचा सण मोठ्या आनंदाने साजरा करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शूर सशस्त्र दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, की मी तुमच्यामध्ये असून प्रत्येकाकडून मी काहीतरी शिकलो आहे, आजचा दिवस अद्भुत व दृश्य अत्यंत संस्मरणीय आहे. आज एका बाजूला माझ्यासमोर अथांग समुद्र आहे आणि दुसर्‍या बाजूला भारतमातेचे शूर वीर जवान आहेत. खोल समुद्रातील रात्र आणि
सूर्योदयाने माझी दिवाळी अनेक प्रकारे खास बनवली आहे. तिन्ही दलाच्या समन्वयामुळेच पाकने शरणागती पत्करली.
पंतप्रधान मोदींनी सोमवारी (दि.20) गोवा आणि कारवार किनार्‍यावरील आयएनएस विक्रांत या युद्धनौकेला भेट दिली. येथे पंतप्रधान मोदींनी नौदलाच्या जवानांना संबोधित केले आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. गेल्या वर्षी पंतप्रधानांनी गुजरातमधील कच्छला भेट दिली होती, जिथे त्यांनी बीएसएफ, लष्कर, नौदल आणि हवाई दलातील सैनिकांना मिठाई वाटली होती. गेल्या 11 वर्षांत, पंतप्रधानांनी दिवाळीसाठी जम्मू आणि काश्मीरला चार वेळा भेट दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *