लक्ष दीप हे उजळले घरी!

आज लक्ष्मीपूजन : नवचैतन्याची अनुभूती

नाशिक : प्रतिनिधी
दीपोत्सवातील लक्ष्मीपूजन आज (दि. 21, मंगळवार) घरोघरी साजरे करण्यात येणार आहे. दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी साजरी होणार असल्याने प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. सर्वत्र नवचैतन्य पसरल्याचे चित्र पाहावयास मिळतेे. यंदाची दिवाळी अनेक अर्थाने विशेष आहे. यावर्षी दिवाळी सहा दिवसांची आहे. दिवाळीतील सर्वांत महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीची मनोभावे, यथासांग पूजा करून, घरासमोर सुशोभित रांगोळी काढून, दारी झेंडूच्या माळा लावून, फराळाचा, लाह्या, बत्ताशांंचा नैवेद्य दाखवून आश्विन महिन्यातील अमावस्येस लक्ष्मीपूजन केले जाते. गरीब, श्रीमंत सर्वजण आपापल्या परीने देवीची मनोभावे पूजा करतात. लक्ष्मी प्रसन्न व्हावी, तिची कृपा असावी यासाठी लक्ष्मीची पूजा केली जाते. आश्विन महिन्याच्या कृष्णा पक्षात चतुर्दशीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते.

लक्ष्मीपूजन मुहूर्त

लक्ष्मीपूजनासाठी सर्वांत शुभ वेळ प्रदोष काळ (सूर्यास्तानंतरचा काळ) आणि वृषभ काल (स्थिर लक्ष्मीचा काळ) मानला जातो. 21 ऑक्टोबर (मंगळवार) रोजी सायंकाळी 5.32 वाजल्यापासून ते रात्री 8.16 वाजेपर्यंत (वेळेत स्थानिक पंचांगानुसार थोडा बदल असू शकतो.) हा पूजेसाठी उत्तम शुभ मुहूर्त आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *