20 कॅमेरे, 18 मचाणी उभारून प्राण्यांचा शोध

वनविभागाचा उपक्रम: पुनवेच्या लख्ख प्रकाशात प्राणी गणना
नाशिक ः प्रतिनिधी
बुद्ध पौर्णिमेला दरवर्षी होणारी प्राण्यांची गणना करण्यासाठी वन्यजीव विभाग सज्ज झाला असून, येत्या 16 तारखेला पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात ही प्राण्यांची गणना करण्यात येणार आहे. त्यासाठी
वनविभागातर्ङ्गे वीस कॅमेरे वापरण्यात येणार असून, 18 ठिकाणी मचाणी उभारण्यात येणार आहेत. त्याद्वारे प्राण्यांच्या हालचाली टिपण्यात येतील. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात ही गणना करण्यात येणार आहे .
कोरोनामुळे दोन वर्षांपासून वन्य प्राणी गणना करण्यात आली नव्हती. मात्र, आता कोरोनाचे निर्बंध हटल्याने यंदा ही गणना होणार आहे. वारंवार मानवी वस्त्यांमध्ये आढळून येणारे बिबटे,मोर,इतर जंगली श्‍वापदे यामुळे वन्यप्राण्यांचा अधिवास धोक्यात आल्याचे चित्र निर्माण होत आहे.वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात नेमक्या किती प्राण्यांची वाढ किंवा घट झाली याची माहिती घेण्यासाठी पोर्णिमेच्या लख्ख प्रकाशात कॅमेरा ट्रॅपिंगचा वापर,प्राण्यांची विष्ठा,ठसे आदींचा वापर करून मिळालेल्या आकडेवारीची सरासरी काढली जाते.त्याआधारे वन्यजीवांच्या संवर्धनाचे नियोजन केले जाते.
सोमवारी(दि.16)रात्री बारा ते दुसर्‍या दिवशी रात्री बारापर्यत गणना होणार आहे. कळसुबाई अभयारण्यात भंडारदरा व राजूर या वनक्षेत्रात प्रगणना होणार असून त्यासाठी 18 ठिकाणी मचाण उभे केलेले आहे. मचाणीवर संबंधित नियतक्षेत्राचे वनरक्षक, वनमजूर व बाहेरील एक ते दोन सदस्य राहणार आहेत. या वर्षी डॉ . डी . वाय पाटील कॉलेज आकुर्डी पुणे येथील विद्यार्थी व बी.एन.एच.एस. मुंबई यांचे सदस्य निसर्गानुभव घेण्यासाठी येणार आहेत. या प्रगणनेसाठी वन्यजीव विभागाने वाय एल केसकर , उपवनसंरक्षक वन्यजीव विभाग नाशिक गणेश रणदिवे सहा . वनसंरक्षक कळसुबाई हरिश्चंद्रगड यांचे मार्गदर्शनाखाली प्रगणनेची तयारी केली आहे.

भंडारदरा वनक्षेत्रात प्रगणनेसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तयारी झालेली असून, बुध्द पौर्णिमेच्या दिवशी निसर्गानुभवाची आवड असणार्‍या वन्यजीव प्रेमींनी प्रगणनेचा रोमांचकारी अनुभव घ्यावा.
अमोल आडे
वनपरिक्षेत्र अधिकारी भंडारदरा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *