निसर्गप्रेमींना मिळणार काजवा महोत्सवाचा आनंद

नागरिकांच्या विरोधामुळे नियम, अटींचे पालन बंधनकारक
नाशिक ः प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने तब्बल 2 वर्षानी पर्यटकांना भंडारदरासह कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात काजव्यांचा लखलखाट पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी व जून महिन्याच्या पहिल्या आठवडयात काजवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. वन्यजीव विभागाने काजवा महोत्सवाचे नियोजनासाठी कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील सर्व ग्राम विकास समितीचे अध्यक्ष , सरपंच , पोलीसपाटील व ग्रामस्थांची सभा सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे व सहायक पोलीस निरीक्षक साबळे यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. काजवा महोत्सवात गाडयांच्या पार्किंगसाठी वेगळी व्यवस्था करण्याचे नियोजन ठरविण्यात आले. तसेच रस्त्यावर गाडी पार्किंग करणे, मद्यपान करणे, धिंगाणा करण्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत वन्यजीव विभागाने दिले. काजवा महोत्सवास पर्यावरण प्रेमींचा विरोध असून, महोत्सवामुळे काजवे कमी होत असल्याचे त्यांनी सुचित केले आहे. त्यावर काजव्यांना वाहनांच्या लाईटचा त्रास होऊ नये यासाठी काजवे ज्या भागात आहेत. तेथून दूर अंतरावर लाईटचा वापर कमीत कमी करावा याबाबत पर्यटकांचे प्रबोधन वन्यजीव विभाग करणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे , वनपरिक्षेत्र अधिकारी डी.डी. पडवळे यांनी सांगितले.

पर्यावरणपप्रेमीचा काजवा महोत्सवास विरोध होत असल्याचे समाजमाध्यमाद्वारे दिसून येत आहे.त्यामुळे वनविभागाने काजवा महोत्सवादरम्याने नियम अटी घालण्यात आल्या आहेत.वाहने दूर उभी करावीत,मद्यपान करणे,हुल्लडबाजी करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहे.

दोन वर्षानी पर्यटकांना भंडारदरासह कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात काजवे पाहण्याची संधी मिळणार आहे. काजवा महोत्सवादरम्यान पर्यटक,निसर्गप्रेमीना नियम अटी घालण्यात आल्या आहेत.हुल्लडबाजी करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
अमोल आडे
वनपरिक्षेत्र अधिकारी भंडारदरा
,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *