डॉ. बाबा आढाव यांचे निधन
पुणे :
’सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर’ ही प्रार्थना जनमानसात रूढ करणारे, समता-न्याय बंधुत्वाचा जागर करणारे, घरोघरी संविधान पोहोचवण्याचा संकल्प केलेले, कष्टकर्यांचे नेते डॉ. बाबासाहेब पांडुरंग आढाव यांचे काल निधन झाले. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, काल साडेआठच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे पत्नी शीला आढाव, असीम आणि अंबर हे दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
गेल्या बारा दिवसापासून पुना हॉस्पिटलमध्ये बाबा आढाव यांना रुग्णालयात दाखल केले होते. सुरुवातीला ते उपचारांना प्रतिसाद देत होते. त्यानंतर त्यांची किडनी फेल झाली. काल 8 वाजून 25 मिनिटांनी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झालं. उद्या सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत मार्केट यार्ड येथील हमाल भवन येथे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी कुठलीही धार्मिक विधी पार न पाडता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पुण्यात एका सामान्य कुटुंबात 1 जून 1930 रोजी बाबांचा जन्म झाला. ते तीन महिन्यांचे असतानाच वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर आजोळीच ते लहानाचे मोठे झाले. शाळेत असतानाच वयाच्या बाराव्या वर्षी अर्थात 1942 मध्ये राष्ट्र सेवा दलात दाखल झाले. भाई वैद्य, पन्नालाल सुराणा आणि बापू काळदाते आणि बाबा यांनी एकत्र /-…4