स्मार्ट पार्किंग; तांत्रिक तपासणीचे काम हाती

तीन संस्थांत स्पर्धा; 28 ठिकाणी पार्किंगचे नियोजन

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेने शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी दीड-दोन महिन्यांपासून निविदा प्रक्रिया राबवली जात आहे. प्रारंभी या निविदेकडे ठेकेदारांनी पाठ फिरवल्याचे दिसले होते. परंतु प्रशासनाने फेरनिविदा काढल्यानंतर तीन संस्थांनी 28 ठिकाणी पार्किंग सुरू करण्यास तयारी दर्शवत अर्ज केले आहेत. दरम्यान, या संस्था पार्किंग चालविण्यासाठी पात्र आहेत की नाहीत, याची तपासणी महापालिका प्रशासनाच्या टेंडर सेलकडून सुरू करण्यात आली आहे.
शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी महापालिकेच्या वाहतूक सेलने 28 ठिकाणी स्मार्ट पार्किंगचे नियोजन केले आहे. दरम्यान, ठेकेदाराने महापालिकेला महिन्याला 35 लाख रुपये द्यावेत, या जाचक अटीमुळे ठेकेदारांनी पाठ फिरवल्याचे चित्र होते. प्रशासनाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी ही रक्कम 22 लाखांवर आणली; परंतु तरीही ठेकेदारांनी निरुत्साह दाखवली. प्रशासनाने आणखी एक पाऊल मागे घेत ही रक्कम तेरा लाखांवर आणली. त्यानंतर तीन संस्थांनी या कामास तयारी दर्शवली आहे. 22 ऑनस्ट्रीट आणि सहा ऑफस्ट्रीट अशा एकूण 28 स्मार्ट पार्किंगसाठी 17 सप्टेंबर रोजी निविदा प्रक्रिया प्रसिद्ध केली होती. शहरात दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत भर पडत आहे. वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याने मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावर वाहने लावली जातात. परिणामी वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो. सिंहस्थात कोट्यवधी भाविक येणार असल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू नये याकरिता कुंभमेळ्यापूर्वी वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली लावला जाणार आहे. स्मार्ट पार्किंगमुळेे 4,155 वाहने विशिष्ट ठिकाणी उभी करता येणार आहेत. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी वाहतुकीची समस्या उद्भवणार नाही.

या संस्थांचे अर्ज

1) लक्ष्मी इलेक्ट्रिकल्स 2) ए.एस. मल्टी सव्हिर्र्सेस 3) बरकत कॉन्ट्र

 

तीन संस्थांनी स्मार्ट पार्किंग चालवण्यासाठी तयारी दर्शवली आहे. मात्र, या संस्था सदर कामासाठी पात्र आहेत की नाहीत, हे तांत्रिक तपासणीतून समोर येईल. अटी-शर्ती पूर्ण करणार्‍या संस्थेला काम दिले जाईल.
– रवींद्र बागूल, कार्यकारी अभियंता, वाहतूक सेल, मनपा

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *