जिल्हाधिकार्‍यांनी घेतला कार्यालयातील सर्व विभागांचा आढावा

नाशिक : प्रतिनिधी
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा प्रशासनातील कामकाजाला गती देण्यासाठी सर्व विभागांचा आढावा घेत कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या. यावेळी महसूल विभागाच्या आढावा बैठकीत सवर्र् अधिकार्‍यांनी महसुली कामकाजाची उद्दिष्टे नियोजित कालावधीत पूर्ण करण्यासाठी कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना प्रसाद यांनी दिल्या.

यावेळी अपर जिल्हाधिकारी (मालेगाव) देवदत्त केकाण, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (इगतपुरी/ त्र्यंबकेश्वर) पवन दत्ता, उपविभागीय अधिकारी (नाशिक) अर्पिता ठुबे, उपविभागीय अधिकारी (कळवण) नरेश अकुनरी, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, सीमा अहिरे, शर्मिला भोसले, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) कुंदन हिरे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) राजेंद्र वाघ यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते. नुकसानभरपाईसंदर्भातील प्रकरणे सादर करताना सर्व वारसांच्या वंशावळीची नोंद अचूक असावी. भूसंपादनाच्या प्रकरणांत क. जा. पत्रक प्राप्त करून त्यांची नोंदणी करावी, तसेच प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यास गती द्यावी. घरकुलांसाठी मोफत वाळू योजनेची अंमलबजावणी करताना वाळू गटांची प्री-बीड बैठक घेण्यात यावी. अवैध वाळूसंदर्भातील प्रकरणात ई-पंचनामा करणे बंधनकारक आहे. यासाठी सर्व तहसीलदारांनी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी ई-पंचनामासंदर्भातील प्रशिक्षण आयोजित करावे. महसूलसंदर्भातील न्यायालयीन प्रकरणे विशेष मोहीम घेऊन निकाली काढावीत. मनरेगासंदर्भातील निधी मागणीचे प्रस्ताव सादर करताना ते तालुकानिहाय व वर्षनिहाय असावेत. मागणीनुसार ज्या वर्षासाठी निधी प्राप्त झाला आहे, त्याची प्रतिपूर्ती करताना काटेकोर नियोजन करावे. दुबार निधी मागणी टाळण्यासाठी त्या वर्षातील कोणतेही प्रकरण प्रलंबित नाही, असा दाखला सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सर्व अधिकार्‍यांनी डिसेंबरअखेर गोदामांची तपासणी पूर्ण करावी.अंत्योदय योजनेतील मृत लाभार्थी वगळण्यासाठी निवडणूक शाखेतील फॉर्म क्रमांक 7 ची यादी तपासून व पडताळून अंतिम यादी
सादर करावी.
धान्य खरेदी केंद्रांना अधिकार्‍यांनी भेट द्यावी. यासोबतच शिवभोजन केंद्रांच्या तपासणीसाठी पथकाची नियुक्ती करावी. घरपोच रेशन वाहतुकीची वेळोवेळी तपासणी करावी. आगामी काळात सुरू करण्यात येणार्‍या जनगणनेसाठी पूर्वानुभव असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिल्या.

ई-ऑफिस प्रणालीतून कामकाजाच्या सूचना

ई-ऑफिस प्रणाली जिल्हाधिकारी कार्यालयात 1 डिसेंबरपासून अनिवार्य केली आहे. सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी या प्रणालीतून कामकाज करावे, अशा सूचना देण्यात आल्या.

रिंगरोड भूसंपादनास गती द्यावी

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नियोजित रिंगरोडच्या भूसंपादनाच्या कामास गती द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी प्रसाद यांनी संबंधित विभागांना दिल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *