जानोरीला आगीत 15 लाखांचे नुकसान

बॉक्स, पुठ्ठ्याच्या गोदामाला भीषण आग

दिंडोरी : प्रतिनिधी
तालुक्यातील जानोरी येथे सोमवारी पहाटे बॉक्स व पुठ्ठ्याच्या गोदोमाला भीषण आग लागल्यामुळे गोदामामधील साहित्य व इतर वस्तू खाक झाल्या. त्यात अंदाजे 10 ते 15 लाखांचे नुकसान झाले. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट झाले नाही. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
जानोरी येथील माणिक घुमरे यांच्या गट क्रमांक 32 मधील शेतातील पत्र्याच्या गोदामामध्ये नंदू कश्यप अनेक दिवसांपासून बॉक्सचा व्यवसाय करतात. आज पहाटे चारच्या सुमारास गोदामाला आग लागली, ही आग अतिशय भीषण होती, गोदामामधील सर्व वस्तू व बॉक्स जळून खाक झाले. आग विझवण्यासाठी एचएएल व ओझर नगर परिषदेची अग्निशमक दलाच्या तत्परतेने आग नियंत्रणात आणली. यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, ही आग लागल्यामुळे नाशिक विमानतळ ते दहावा मैल हा रस्ता अतिमहत्त्वाचा वर्दळीचा असून, या रस्त्यावर अनेक अवैध भंगार दुकाने थाटण्यात आली आहे. याअगोदरदेखील भंगार व्यवसायकांबद्दल प्रसारमाध्यमांकडून बातम्या प्रसारित करण्यात आल्या होत्या. त्यावर ग्रामपंचायतीकडून संबंधित भंगार व्यावसायिकांना व जागामालकांना नोटीस बजावल्या होत्या; परंतु ग्रामपंचायत नोटिसांनादेखील या व्यवसायकांनी केराची टोपली दाखविली आहे, आग लागण्याच्या या घटनेने पुन्हा एकदा भंगार दुकाने व इतर व्यवसाय करणारे चर्चेत आलेले आहे. यावर स्थानिक प्रशासन किंवा संबंधित प्रशासन काही ठोस कारवाई करणार का? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

माझ्या शेतातील गट क्रमांक 32 मध्ये पत्र्याचे गोदाम असून, त्यात गुलाबाचे बॉक्स व पेरूचे बॉक्स, तसेच पुठ्ठ्याचा व्यवसाय नंदू नावाचा इसम करत होता. परंतु सोमवारी गोदामाला आग लागल्याने बॉक्स व पुठ्ठ्याचे साहित्य जळून खाक झाले आहे. यात अंदाजे 10 ते 15 लाखांचे नुकसान झाल्याचे भाडेकरू नंदू कश्यप याने सांगितले आहे.
– माणिक घुमरे, शेतकरी, जानोरी

Fire in Janori causes loss of Rs. 15 lakhs

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *