प्रभाग एकमध्ये यंदाही ’कमळ’च; मतदारांचा निर्धार

पंचवटी : प्रतिनिधी
विकासाची अविरत परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रभाग एकमध्ये यंदाही ’कमळा’समोरील बटण दाबून भाजपालाच निवडून देण्याचा निर्धार मतदारांनी प्रचारदौर्‍यात व्यक्त केला. प्रभाग क्रमांक एकमधील भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांचा प्रचार-दौरा दिंडोरी रोड परिसरातील विविध कॉलनी परिसरात झाला. भाजपाचा झंझावाती प्रचार पाहून नागरिकांनी यंदाही विजय निश्चित असल्याची भावना व्यक्त केली.
प्रभाग एकमधील प्रचारदौर्‍याची सुरवात आकाश पेट्रोलपंप येथून करण्यात आली. त्यानंतर सावरकर गार्डन, गीतानगर, स्नेहनगर, वृंदावननगर, हरिहरनगर, फिटनेस सोसायटी, गुलमोहरनगर या मार्गावर प्रचारदौरा पार पडला.
यावेळी ठिकठिकाणी नागरिकांनी चारही उमेदवारांचे स्वागत करत महिलांना औक्षण केले. परिसराचा होत असलेला विकास बघता चारही उमेदवारांना निवडून देण्याचा निर्धार व विजयाचा विश्वास यावेळी नागरिकांनी व्यक्त केला.
यावेळी प्रभाग क्रमांक एकमधील उमेदवार रूपाली स्वप्नील नन्नावरे, रंजना पोपटराव भानसी, दीपाली गणेश गिते, अरुण बाबूराव पवार यांसह सतीश वावीकर, मनोज बाग, आर. डी. कुलकर्णी, सीताराम पवार, श्याम धनगर, अशोक जाधव, विलास हटकर, वंदना भोसले, शीतल कासलीवाल, रोहिणी दळवी, सविता गावित, सोनाली पवार व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

भाजपाच्या चारही उमेदवारांचे पारडे जड

गेली अनेक वर्षे भाजपाचा बालेकिल्ला असलेला प्रभाग क्रमांक एकमध्ये यंदाही भाजपाच्या चारही उमेदवारांचे पारडे जड असल्याची भावना मतदारांकडून व्यक्त केली जात आहे. प्रभागाचा सातत्याने होणारा विकास, अनुभवी व सुशिक्षित उमेदवार यामुळे गेल्या अनेक वर्षांचे विकासाचे सातत्य कायम ठेवण्यासाठी भाजपाचे चारही उमेदवार निवडून देण्याचा निर्धार मतदारांनी केल्याने भाजपाचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.

This year too, ‘Kamal’ will be the winner in Ward 1; Voters’ determination

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *