युरियाच्या टंचाईमुळे शेतकरी वैतागले

पिकांची वाढ खुंटली; खताच्या लिंकिंग पद्धतीमुळे दुहेरी संकट

दिंडोरी : प्रतिनिधी
खरिपाच्या हंगामातील पिकांची वाढ चांगल्या पद्धतीची व्हावी याकरिता युरियाची गरज असताना शेतकर्‍यांना ते मिळेनासे झाले आहे. त्यात कृत्रिम टंचाई निर्माण होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. त्यातच लिंकिंग पद्धतीने डोके वर काढल्याने शेतकर्‍यांची डोकेदुखी वाढली आहे. दुहेरी संकटात शेतकर्‍याला अडकविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.
खत कंपन्यांच्या लिंकिंगमुळे दुकानदारही अडचणीत सापडले आहेत. त्यांनी लिंकिंगच्या सक्तीमुळे युरियाच ठेवणे बंद केले आहे. कृषी विभागाने शेतकर्‍यांप्रति अधिक सजग होऊन युरियाचे संकट दूर करावे, अशी मागणी होत
आहे.
खरीप हंगामातील मका, सोयाबीन यांसह कडधान्ये ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. त्यांची उंची जोमाने व्हावी, यासाठी युरियाची गरज असताना दिंडोरी तालुक्यात टंचाईमुळे गहू पिकाची वाढ खुंटली आहे.

युरियाचा तुटवडा असल्याने चिंतेत वाढ झाली आहे. शेतकरी दररोज गावातील दुकानात जातो. परिसरात जाऊन चौकशी करतो; परंतु त्याला नकार मिळत असल्याने तो नाराज होऊन परतत आहे. त्यातच नुकत्याच लागवड झालेल्या उसाला युरिया देण्याची गरज असताना खतांचा डोस देऊ शकले नाहीत. गेले महिनाभर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ही स्थिती आहे. गहू, हरभरा, मका आदी पिकांसह भाजीपाला पिकांना युरिया खताची नितांत आवश्यकता आहे. शासनाने शेतकर्‍यांना युरिया उपलब्ध करून द्यावा.
– गोविंद लगड, शेतकरी, परमोरी

खत दुकानदारांचा नकार

युरियाच्या 50 किलो गोणीची किंमत 266 रुपये आहे. त्यासाठी 20 रुपये भाडे घेतले जाते. त्यातच खत कंपन्या दुकानदारांना लिंकिंग म्हणून त्याच्या दुप्पट किमतीची अन्य खते, तणनाशके देतात. त्यामुळे ग्रामीण भागातील दुकानदारांनी युरियाची खरेदी करण्यास नकार दिला आहे.

Farmers frustrated due to urea shortage

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *