तीळगूळ घ्या, गोड गोड बोला!

आज मकरसंक्रांतीचा सण; उत्तरायणाला प्रारंभ

नाशिक : प्रतिनिधी
नववर्षातील पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. मकरसंक्रांतीचा सण तीळगुळाच्या गोडव्यासह उत्साहात साजरा करण्यात येतो. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा मकरसंक्रांत साजरी केली जाते. हा दिवस सूर्यदेवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार सूर्यदेवाचे उत्तरायण मकरसंक्रांतीच्या दिवशी होते. सनातन धर्मात सूर्याच्या उत्तरायणाला विशेष महत्त्व आहे. मकरसंक्रांतीच्या शुभ दिवशी भाविक नद्यांमध्ये पवित्र स्नान करतात. यासोबतच या दिवशी पूजा, दान व जपाचेही महत्त्व आहे.

असा आहे शुभमुहूर्त

पंचांगानुसार, मकरसंक्रांतीचा शुभमुहूर्त सकाळी 9.03 ते संध्याकाळी 5.46 पर्यंत असेल. महापुण्यकाळ सकाळी 9.03 ते 10.48 पर्यंत असेल.

मकरसंक्रांतीचे महत्त्व

मकरसंक्रांतीच्या दिवशी सुगडपूजन करण्यात येते. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी पतंग उडवण्याचा आनंद घेतला जातो. नवदांपत्यांसाठी मकरसंक्रांत हा सण खास असतो. या दिवशी हलव्याचे दागिने घालण्यात येतात. नवजात बालकांनाही मकरसंक्रांतीच्या दिवशी हलव्याचे दागिने घालून, सजवून तयार करतात. त्यांचे लाड पुरवले जातात. बालकांना बोरन्हाण घालण्याचीदेखील प्रथा आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *