साप्ताहिक राशिभविष्य

 

दि. 1 ते 7 फेब्रुवारी 2026

पुरुषोत्तम नाईक

मेष : लाभ होतील
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू संमिश्र आहे. रवी प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांनी वरिष्ठांशी व सहकार्‍यांशी संघर्ष व वाद टाळावेत. व्यापारी, व्यावसायिकांची आर्थिक गणिते जुळतील. शेअरमध्ये लाभ होतील. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामास विलंब होईल. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ : जोरदार आगेकूच
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च नियंत्रणात राहतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. मंगलवार्ता कळतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. शासकीय, कोर्ट-कचेरीची कामे मनाप्रमाणे होतील. आरोग्य चांगले राहील.
मिथुन : भाग्योदय होईल
या सप्ताहात बुध, शुक्र, शनि, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, मंगळ प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. खर्च नियंत्रणात राहतील. नोकरदारांची कामासाठी धावपळ होईल. व्यापारी, व्यावसायिकांचा भाग्योदय होईल. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा, आरोग्य जपा.
कर्क : धनचिंतांना उतार
या सप्ताहात मंगळ, शनि अनुकूल आहेत. रवी, बुध, शुक्र, गुरू, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च वाढतील. धनचिंतांना उतार पडेल. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांना अडचणींना तोंड द्यावे लागेल. शेअरमध्ये केलेली गुंतवणूक अडचणीत येईल. कौटुंबिक वाद सामंजस्याने सोडवा. प्रकृती जपा.
सिंह : यशप्राप्ती होईल
या सप्ताहात बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. रवी, मंगळ, शनि, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांच्या अडचणी दूर होतील. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. आरोग्याकहे दुर्लक्ष करणे त्रासदायक ठरेल.
कन्या : सतर्क राहा
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. शुक्र, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना अडचणींना तोंड द्यावे लागेल. व्यापारी, व्यावसायिकांना विरोधकांच्या कारवायांना तोंड द्यावे लागेल. आरोग्य चांगले राहील.
तूळ : सुखवार्ता कळतील
या सप्ताहात बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, मंगळ, शनि प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांची धावपळ होईल. व्यापारी, व्यावसायिकांना सुखवार्ता कळतील. विरोधकांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्य चांगले राहील. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल.
वृश्चिक : स्थावराचे प्रश्न सुटतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांना अडचणींना तोंड द्यावे लागेल. स्थावराचे प्रश्न सुटतील. प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल.
धनु : आडाखे अचूक ठरतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू, गुरू अनुकूल आहेत. शनि प्रतिकूल आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. नोकरदारांच्या समस्या सुटतील. व्यापारी, व्यावसायिकांचे आडाखे अचूक ठरतील. शासकीय, कोर्ट- कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल.
मकर : आर्थिक समृद्धी
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांना आर्थिक समृद्धी प्राप्त होईल. धनचिंता दूर होतील. आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ : प्रवास टाळा
या सप्ताहात बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, मंगळ, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे प्रतिकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक अडचणी त्रस्त करतील. खर्च वाढतील. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. नोकरदारांविषयी वरिष्ठांचे गैरसमज होतील. व्यापारी, व्यावसायिकांची समीकरणे जुळतील. राहत्या घराचे प्रश्न निर्माण होतील. बांधकाम व्यावसायिकांनी जपून व्यवहार करावेत. विनाकारण धाडस टाळावे.
मीन : समस्या सुटतील
या सप्ताहात रवी, मंगळ अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च मोठ्या प्रमाणात वाढतील. आर्थिक फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही. नोकरदारांच्या समस्या सुटतील. व्यापारी, व्यावसायिकांची गणिते चुकतील. मानसिक अस्वास्थ जाणवेल. आरोग्याची काळजी घ्या.

weekly-horoscope-21

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *