व्हॉट्सअ‍ॅप, फोनद्वारे 14.25 लाखांची फसवणूक

इन्शुरन्सचे अधिकारी असल्याचे भासवून वृद्धास गंडा

लासलगाव : वार्ताहर
मॅक्स लाइफ इन्शुरन्स कंपनीचे कर्मचारी व अधिकारी असल्याचे भासवून लासलगाव येथील 82 वर्षीय सेवानिवृत्त अधिकार्‍याला व्हॉट्सअ‍ॅप व फोनद्वारे संपर्क साधत पाच जणांनी तब्बल 14 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी रामराव रामचंद्र कौठे (वय 82, व्यवसाय सेवानिवृत्त, सहकार खाते, महाराष्ट्र शासन, स्टेशन रोड, लासलगाव) यांच्या राहत्या घरी 20 नोव्हेंबर 2025 ते 19 डिसेंबर 2025 पावेतो व्हॉट्सअ‍ॅप व फोनवर आरोपी सिमरन (मो. क्र. 8826159479), रवी कपूर (व्हॉट्सअ‍ॅप क्र.9368132420, 7880493317), गीता बॅनर्जी (9068701109), विजयसिंग (7880493317, 7566597015, 7706876339), अनिलकुमार दास (7909566530) या पाच संशयितांनी फिर्यादी रामराव कौठे यांना मॅक्स लाइफ इन्शुरन्स कंपनीचे कर्मचारी व अधिकारी आहेत, असे भासविणारे व्हॉट्सअ‍ॅप व फोनद्वारे कॉल करून मॅक्स लाइफ इन्शुरन्स पॉलिसीवर एजंटचे 30 टक्के कमिशन मिळवून देतो, तसेच कोरोना काळात कंपनीने 10 दहा लाख रुपये जमा केले आहेत, असे एकत्रित 26 लाख 71 हजार 706 रुपये तुम्हाला मिळतील, असे सांगून नमूद कंपनीच्या नावाने पैसे जमा करण्यास सांगून त्याची पावती पाठवली.
फिर्यादीची एकूण 14 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केली. सायबर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक नागेश मोहिते तपास करीत आहेत.

Fraud of Rs 14.25 lakhs through WhatsApp, phone

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *