तटकरेंचे लाडक्या बहिणींना आवाहन
मुंबई : ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया चुकली असेल त्यांनी 31 मार्च 2026 पर्यंत दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास 31 डिसेंबर 2025 ची मुदत देण्यात आली होती. त्यादरम्यान महिलांकडून काही चुकीचे पर्याय निवडले गेल्याने त्यांचा लाभ बंद झाला होता. आता राज्य सरकारने पुन्हा एकदा ई- केवायसी दुरुस्तीसाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून 31 मार्चपर्यंत ई-केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा हीच महिला व बालविकास विभागाची प्रामाणिक भूमिका आहे.
Make corrections in e-KYC process by March 31