मुंबई :
मुंबईच्या राजकारणामध्ये मोठा ट्वीस्ट आला असून, आता शरद पवारांनी डाव खेळला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी एकत्रित निवडणूक लढवली होती. मात्र, आता राष्ट्रवादी शरद पवार गटाने ठाकरे बंधूंना सोडून दिली. भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा एकमेव नगरसेवक अजित रावराणे आहे. त्यांनी आता महायुतीला पाठिंबा देत असल्याचे स्पष्टपणे जाहीर केले आहे. नगरसेवक अजित रावराणे यांनी सत्ताधारी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे ठाकरे बंधूंना मोठा झटका बसला आहे. यामुळे महापालिकेत आता दोन्ही राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभ्या असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे.