गोदावरी घाट बांधकाम प्रश्न चिघळण्याची शक्यता

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर येथील गोदावरी घाट बांधकामाच्या बाबत शासनाच्या अतातायी भूमिकेने संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी बांधकाम खोदकाम बंद पाडले. मात्र, तरीदेखील बुधवारी सकाळी काम सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने सर्व बाधित शेतकरी एकत्र येऊन त्यांनी शासनाला निवेदन देत आंदोलन सुरू करत असल्याचा इशारा दिला आहे. शासन बळजबरी काम सुरू ठेवणार असेल तर गोदावरी नदीपात्रात साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचा निर्धार व्यक्त करणारे पत्र तहसीलदार, पोलीस यांसह मुख्यमंत्री, राज्यपाल, कुंभमेळामंत्री, नगरविकासमंत्री यांना कळविण्यात आले आहे.
त्र्यंबकेश्वर नगरपरिषद हद्दीत प्रस्तावित 30 मीटर हरित पट्टा व 24 मीटर रस्ता यांसह घाटाची बांधणी अल्पावधीत पूर्ण करण्यासाठी शासन गतिमान झाले आहे. तथापि बाधित शेतकर्‍यांच्या जमिनीबाबत निर्णय घेण्यास दुर्लक्ष करत आहे. येथे सुमारे 25 लाख रुपये प्रति गुंठा बाजारभाव असलेल्या जमिनी कवडीमोल दरात संपादित करण्याचा प्रयत्न होत आहे. भूसंपादन कायदा 2013 मधील तरतुदींचे संपूर्ण पालन न करता कार्यवाही सुरू करण्यात आल्याचेही शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी हुकूमशाही पद्धतीने बुलडोझरद्वारे शेतीची नासधूस होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. योग्य मोबदला, कायदेशीर प्रक्रिया आणि पारदर्शकता न पाळल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात
आला आहे.

Godavari Ghat construction issue likely to escalate

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *