सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 25 मधील कामटवाडा-मथुरा लॉन्स परिसरात रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर कचर्याचे ढिगारे साचले असून, या ठिकाणी कचर्याचा ‘ब्लॅक स्पॉट’ निर्माण झाला आहे. साचलेल्या कचर्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढली असून, तीव्र दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
या मार्गावरून ये-जा करणार्या नागरिकांना नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी दुर्गंधीचा अधिक त्रास होत असल्याचे नागरिकांचे
म्हणणे आहे.
महापालिकेच्या घंटागाडी विभागाने दररोज या ठिकाणचा कचरा उचलून नियमितपणे विल्हेवाट लावावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच रस्त्यावर कचरा फेकणार्या नागरिकांवर मनपाच्या अरोग्य विभागाच्या पथकाने दंडात्मक कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
‘Black spot’ of garbage in Mathura Lawns area