मखमलाबाद केंद्रावर बारावीची परीक्षा सुरळीत

पंचवटी : प्रतिनिधी
एच.एस.सी. (बारावी) परीक्षेला सुरुवात झाली असून, मखमलाबाद येथील केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली.
मखमलाबाद येथील केंद्रात एकूण 883 विद्यार्थी प्रविष्ट होते. यात विज्ञान 571, कला 171, वाणिज्य 141 असे विद्यार्थी आहेत. केंद्राच्या आत केवळ परीक्षेसाठी बसणार्‍या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येत होता. तर विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सोडण्यास आलेल्या पालकांची केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. परीक्षा केंद्राच्या बाहेर पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी स्थानिक दक्षता समिती अध्यक्ष सदस्य तथा मविप्र संस्थेचे संचालक रमेश पिंगळे, रामदास पिंगळे, नगरसेवक वाळू काकड, नगरसेविका रोहिणी पिंगळे, वसंत गोवर्धने, कल्पना पिंगळे, प्राचार्य संजय डेर्ले, जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत जिल्हास्तरीय दक्षता पथकाचे विवेक खैरनार, विलास चव्हाणके, जितेंद्र जगताप आदी उपस्थित होते.

Class 12th exam conducted smoothly at Makhamalabad center

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *