सोशल मीडिया एक आभासी जग

सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला विषय म्हणजे सोशल मीडिया. त्याचा मुख्य स्रोत म्हणजे मोबाइल. एक वेळ जेवणाशिवाय राहतील पण मोबाइलशिवाय नाही, अशी काही लोकांची गत झाली आहे खरं की नाही. आणि या मोबाइलमधील सोशल मीडिया हे माध्यम म्हणजे जणू काही एकमेकांशी जोडला गेलेला दुवा आणि या फोनमधून आपण फक्त संपर्क हा फोनवर बोलून साधत असायचो पण हळूहळू संदेश देण्यासाठी मेसेज नंतर व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम, ट्विटर असे अनेक प्रकार समोर आले. जे फक्त मेसेजेस देणार नाही तर विनोद शेअर करणं असो आपल्या विविध बिझनेस आयडिया जास्त होत आपल्यातले विविध कलागुण असो, ते सादर करण्यासाठीचे माध्यम इंस्टाग्राम लोकांना वाटायला लागलं आणि यावर बनणार्‍या रीलमधून काही सामान्य मुलं हे रील स्टारसुद्धा झाले. त्यांचे अल्बमसुद्धा आले. मग ट्रेड सुरू झाला या ळपीींरसीरा ला फॉलोवर्स वाढवण्याचा. कोणाचे किती फॉलोवर्स त्यावर त्याची पब्लिसिटी त्यावर तो एक प्रसिद्ध व्यक्ती अशी ख्याती काही लोकांमध्ये आणि त्यांच्या मनात निर्माण झाले.
असंच एक नाव माजी सरपंच असणार्‍या पुण्यातील शिरूर तालुक्यातील कारेगावच्या निर्मला नवलेताईंचं, ज्यांचे पाच लाख फॉलोवर्स आहेत आणि त्या अजितदादा पवार या राष्ट्रवादी गटासाठी अतिशय उत्स्फूर्त आणि योग्य उमेदवार राहतील अशी सगळीकडे चर्चा होती, तर महिला मंडळाच्या समितीवरही त्यांना म्हणून निवडले जाईल, अशी खात्री होती. अशा या ताईंचा काहीशा मतांनी पराभव झालाय सांगण्याचा तात्पर्य असं की, त्यांची फॉलोवर्सची संख्या बघून अनेक जणांना हा प्रश्न पडला होता की, मत का कमी पडलेत पण एक सामान्यज्ञानाचा भाग जर बघितला तर फॉलोवर्स हे ळपीींरसीरा च्या पेजवर असणारे युजर्स हे एकाच गावातले नसून, ते संपूर्ण देशभरातले असू शकतात. त्यात त्यांच्या गावातले किती मतदार आहेत हे आपण सांगू शकत नाही आणि त्या मतदारांपैकी किती जणांनी त्यांना मतदान केले हे आपण सांगू शकत नाही.
सांगण्याचे तात्पर्य असं की, बर्‍याच मुला -मुलींच्या मनात हे घट्ट पेरले गेले की माझे फॉलोवर जास्त म्हणजे माझी प्रसिद्धी जास्त. मी खूप चांगलं व्यक्तिमत्त्व आहे. माझ्यात काहीतरी विशेष आहे. नक्कीच आपण स्वतःला कमी समजलं नाही पाहिजे पण एखाद्या आभासी जगात इतकंही रमलं नाही पाहिजे की आपण सत्य परिस्थिती विसरून जाल. असं म्हणतात ना सुखाच्या वेळी सर्वच येतात
दुःखाच्या वेळी कोण तुमच्या हाकेला जे धावून येतात ती खरी तुमची माणसं. जी तुमच्या अवतीभवती आहेत त्यांना जपायचं सोडून आपण या ऑनलाइनच्या विश्वात इतके रमतो की जे आपल्या जवळची त्यांनाच वेळ देण्याचा विसरून जात समोर बसलेला मित्र चार गोष्टी सांगत असताना आपण मोबाइलवरील इंस्टाग्रामवरच्या मित्र-मैत्रिणींशी बोलताना रंगतो. मदतीला धावून येणारे तेच खरे. या ऑनलाइन विश्वातल्या मित्रांच्या तुलनेत बसतो का?
मी असेही नाही म्हणणार की सोशल मीडिया वाईट. असं म्हणतात प्रत्येक गोष्टीचे जितकेच नकारात्मक तितकेच सकारात्मक परिणामसुद्धा असतात. फक्त त्या वस्तूचा योग्य वापर आपल्याला करता आला पाहिजे. त्या गोष्टीचे योग्य मूल्यमापन आपल्या आयुष्यात आपल्याला करता आले पाहिजे. अक्षरशः चाळीतल्या एका मुंबईच्या मुलाचं त्याच्या वक्तृत्वामुळे आणि त्याच्या विविधमुळे तो एक अल्बम बनवणारा छान रील स्टार बनला. त्याला विविध कार्यक्रम भेटायला लागले. अशाप्रकारे एखादा व्यक्ती आपल्या करिअरही घडवू शकतो. एखादा व्यावसायिक ज्याला जाहिरातीचा खूप काही खर्च करणं शक्य नाहीये तो instagram वरून पोस्ट करून आपल्या व्यवसायाची जर प्रगती करण्याचा प्रयत्न करतोय तर ते नक्कीच साहजिक खूप चांगले कार्य. अशा प्रकारे अनेक मुलांनी आपले व्यवसाय प्रगतसुद्धा केले. ती काळाची गरज आहे असं म्हणून आपण त्याच्याकडे सकारात्मकतेने पाहूया. आपले चांगले विचार, आपले चांगले गुण, चांगल्या गोष्टी सोशल मीडियातून नक्कीच घेऊया पण त्याच्या इतक्याही आहारी जाऊ नका की त्या आभासी जगातून जेव्हा तुम्ही खाली पडाल तेव्हा जमिनीवर फक्त मातीच असेल.

Social media is a virtual world

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *