तरुण उद्योजकाचा नदीत बुडून मृत्यू

सिडको : विशेष प्रतिनिधी
सातपूर औद्योगिक वसाहतीतील तरुण उद्योजक आणि कामटवाडे येथील रहिवासी विजेंद्र नारायण घाटगे (वय 38, रा. स्मॉल वंडर्स रोहाउस, इंद्रनगरी, कामटवाडे) हे नर्मदा परिक्रमेदरम्यान नदीपात्रात बुडून मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली. विजेंद्र नारायण घाटगे यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मयत विजेंद्र घाटगे हे सातपूर औद्योगिक वसाहतीतील ‘तुषार स्प्रिंग’ या कंपनीचे संचालक होते. उद्योगातील यशाबरोबरच अध्यात्म आणि समाजसेवेत त्यांना विशेष आवड होती. त्यांनी अलीकडेच नर्मदा परिक्रमा पूर्ण केली होती आणि त्यानंतर सेवाभावाने बद्रिक आश्रम, शिनोर येथे वास्तव्यास होते.
दि. 13 फेब्रुवारी रोजी त्यांनी इतर साधकांसोबत नदीत स्नान केले. पाण्याची खोली अचूक न ओळखल्यामुळे ते खोल पाण्यात गेले आणि बुडाले. दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांचा मृतदेह नदीत आढळून आला. विजय घाटगे यांच्या पश्चात पत्नी, पाच वर्षांचा मुलगा, आठ वर्षांची मुलगी, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. हसतमुख, कर्तव्यदक्ष आणि सेवाभावी उद्योजकाच्या अकाली निधनाने नातेवाईक, मित्रपरिवार आणि कामटवाडा परिसरात मोठी हळहळ पसरली आहे.

Young businessman drowns in river

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *