स्वीकृत नगरसेवकांसाठी सर्वच पक्षांत लॉबिंग

नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेच्या महापौर आणि स्थायी समिती सदस्यांच्या निवडीनंतर आता स्थायी सभापती व स्वीकृत नगरसेवक पदांवर कोणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवलेल्या भाजपच्या वाट्याला एकूण दहापैकी सुमारे सहा स्वीकृत नगरसेवकपदे येणार असल्याने पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. पक्ष कार्यालयात इच्छुकांची मोठी यादी तयार झाली आहे. या सहा जागांसाठी साडेचारशेहून अधिक इच्छुकांनी अर्ज केल्याने चुरस वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे ज्येष्ठ नेते उत्तम उगले, माजी शहराध्यक्ष प्रशांत जाधव, रश्मी बेंडाळे, नाना शिलेदार, बबलू परदेशी, डॉ. प्रशांत बच्छाव आदींची नावे चर्चेत आहेत. दरम्यान, भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवून शहरातील भाजपच्या तीन आमदारांच्या विधानसभा मतदारसंघांना प्रत्येकी दोन स्वीकृत नगरसेवकपदे देण्याची मागणी केली आहे. या प्रस्तावामुळे अंतिम निर्णयाबाबत उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, शिवसेनेसह उद्धव ठाकरे गटातही स्वीकृत नगरसेवक पदासाठी चुरस आहे. काँग्रेसकडून डॉ. दिनेश बच्छाव, जावेद इब्राहिम, बबलू खैरे, वत्सला खैरे, सेवादलाचे डॉ. वसंत ठाकूर यांची नावे पुढे येत आहेत. राष्ट्रवादीकडून संजय खैरनार, अविनाश खैरे आदी इच्छुक सक्रिय झाले आहेत. सर्वच पक्षांत राजकीय हालचाली वेगात सुरू आहेत.

पंचवटी विभागाला दोन जागांची शक्यता

सर्वाधिक नगरसेवक निवडून देणार्‍या पंचवटी विभागाला दोन जागांचे प्राधान्य मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिक रोडला एक जागा, तर उर्वरित तीन जागा इतर विभागांना देण्याची चर्चा सुरू आहे. अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्याने इच्छुकांचे लॉबिंग शिगेला पोहोचले आहे.

Lobbying in all parties for approved corporators

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *