श्रीक्षेत्र करंजी देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा

ग्रामस्थांनी पेढे वाटून साजरा केला आनंद

दिंडोरी : प्रतिनिधी
तालुक्यातील आंबेवणी येथील जगातील एकमेव पद्मसनस्थित दत्त प्रभूंची मूर्ती असलेल्या श्रीक्षेत्र करंजी देवस्थानला ग्रामविकास विभागामार्फत तीर्थक्षेत्र ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाल्यानंतर ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. या निर्णयामुळे देवस्थान विकासासाठी मदत होणार असल्याची प्रतिक्रिया कृष्णा मातेरे यांनी दिली.
जुलै 2025 मध्ये ग्रामपंचायत आंबेवणी यांच्यामार्फत परिपूर्ण प्रस्ताव पाठवण्यात आला होता. तो प्रस्ताव शासनाने मंजूर केला. यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे योगदान लाभले. आगामी काळात करंजी देवस्थानला येणार्‍या भाविकांसाठी चांगल्या सुविधा पुरवल्या जातील. देवस्थानच्या विकासासाठी मदत होईल, असे मातेरे यांनी स्पष्ट केले. यावेळी करंजी देवस्थानात शासन निर्णय दत्त प्रभूंच्या चरणी अर्पण करून ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी कृष्णा मातेरे, शशिकांत सवंद्रे, रामदास मातेरे, संजय वडजे, आर. आर. मातेरे, भगीरथ चतुर, गोविंद गायकवाड, त्र्यंबक सवंद्रे, विक्रम वडजे, किरण सवंद्रे, पांडुरंग मातेरे, बापूराव गवळी, परशराम मातेरे, सौरभ मातेरे, प्रवीण वडजे, किरण डोखळे, लक्ष्मण वडजे आदी उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *