खग्रास चंद्रग्रहण संपल्यानंतर मंदिरे दर्शनासाठी पुन्हा खुली

नाशिक : प्रतिनिधी
खग्रास चंद्रग्रहण मंगळवार, दि. 3 मार्च रोजी असल्याने ग्रहणकाळात दुपारी 3.20 ते सायंकाळी 6.48 या वेळेत शहरातील अनेक प्रमुख मंदिरांमध्ये गाभार्‍यात प्रवेश, पूजाअर्चा आणि दर्शनव्यवस्था तात्पुरती बंद ठेवण्यात आली होती. प्रशासनाच्या सूचनेनुसार भाविकांनीही सहकार्याची भूमिका घेतली.
श्री काळाराम मंदिर ग्रहणकाळात खुले ठेवण्यात आले होते. मात्र, गाभार्‍यातील धार्मिक विधींवर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. श्री कालिका माता मंदिरात दर्शन पूर्णतः बंद ठेवण्यात आले. कपालेश्वर मंदिर येथे गाभार्‍यासमोर पडदा लावून प्रवेश रोखण्यात आला होता. रविवार कारंजा परिसरातील चांदीचा गणपती मंदिर येथेही ग्रहणकाळात भाविकांना प्रवेश देण्यात आला नव्हता.
ग्रहण सुटल्यानंतर सर्व मंदिरांमध्ये शुद्धीकरण विधी पार पाडण्यात आले. त्यानंतर सायंकाळी मंदिरांचे दरवाजे भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आणि दर्शनव्यवस्था पूर्ववत झाली. भाविकांनी संयम राखत धार्मिक परंपरा पाळल्या.
दरम्यान, वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण होते. भारतात हे चंद्रग्रहण दिसले. ग्रहणाच्या नऊ तास आधी देशात सुतक काळ सुरू होता. चंद्रग्रहण दुपारी 3.20 मिनिटांनी सुरू होऊन संध्याकाळी 6.46 मिनिटांनी संपले. यावर्षीचे पहिले चंद्रग्रहण तीन तास 27 मिनिटे होतेे.

Temples reopen for darshan after Khagras lunar eclipse ends

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *