खड्डे, पाणीप्रश्नावर शुक्रवारची महासभा गाजणार

रस्त्यांसह पाणीपुरवठ्याची विदारक स्थिती; नगरसेवक आक्रमक

नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेतील प्रशासकीय राजवट काळात शहरातील रस्ते, पाणी, ड्रेनेजेच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाल्याचे चित्र आहेे. मात्र, नुकतीच लोकप्रतिनिधींची सत्ता आल्याने आतातरी मूलभूत सुविधा मिळेल, अशी भाबडी अपेक्षा नागरिकांची आहे. दरम्यान, येत्या शुक्रवारी (दि.6) पाणीपुरवठा व शहरातल्या रस्त्यांवर महासभा होत आहे. यावेळी नगरसेवकांकडून चार वर्षांत प्रशासनाने काय दिवे लावले, याचा पंचनामा करण्याची शक्यता असल्याने शुक्रवारच्या महासभेकडे लक्ष लागले आहे.
महापौर हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली मनपा मुख्यालयातील सभागृहात दुपारी 12 वाजता सभा होणार आहे. स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र बाळासाहेब सानप यांच्या सोमवारच्या पत्रास, तसेच स्थायी समिती सदस्य नितीन निगळ, योगेश गाडेकर, इंदूबाई खेताडे आणि सरिता सोनवणे यांच्या पत्रास अनुसरून हा विषय महासभेपुढे ठेवण्यात येणार आहे. शहरातील विविध भागांत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे व नागरिकांना भेडसावणारा पाणीप्रश्न या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा अपेक्षित आहे. अलीकडील काळात रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. याआधीच्या महासभेत नगरसेवकांच्या विविध विषयांवर प्रश्नोत्तरे झाली. यावेळी बहुतेक सर्व नगरसेवकांनी त्यांच्या कामासंदर्भात मागण्या महासभेत केल्या होत्या. मात्र, रस्ते, पाणीपुरवठा व ड्रेनेजच्या प्रश्नावर विशेष महासभा बोलावली जाणार असल्याचे महापौरांनी म्हटले होते.

त्याच त्याच रस्त्यांवर कोट्यवधींचा खर्च

गेल्या चार वर्षांत रस्ते दुरुस्तीवर महापालिकेच्या बांधकाम विभागाने कोट्यवधीची उधळपट्टी केली आहे. विशेषत: त्याच त्याच रस्त्याची कामे करून ठेकेदारांचे खिसे भरण्याचे काम केल्याचा आरोप केला गेला. लोकप्रतिनिधींची सत्ता नसल्याने अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप नगरसेवकांडून आता केला जात आहे. त्यामुळे शुक्रवारची महासभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

Friday’s general assembly will be held on potholes and water issues

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *