गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग

नाशिक ः प्रतिनिधी
अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी बाजारात उत्साहाचे वातावरण दिसत आहे. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या स्वागतासाठी बाजारात उत्साह निर्माण झाला आहे. चैत्र नवरात्राची सुरुवातही होत असल्याने अनेक घरांमध्ये पारंपरिक कुलाचार केला जातो.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन गोष्टी खरेदी केल्या जातात. घर, वस्तू, वाहन व सोने आदी खरेदी केले जाते. गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजाराला बूस्ट मिळण्याची शक्यता आहे. या दिवशी गृहप्रवेश, कार्यालय, दुकानाची सुरुवात केली जाते.
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गुढी उभारली जाते. गुढी ही विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. नवीन कपडे घालून सण साजरा केला जातो. या दिवशी गुढीला सजवून तिचे पूजन केले जाते. पुरणपोळी, श्रीखंड-पुरी आदींचा नैवेद्य दाखविला जातो. शहर आणि उपनगरांमधून नववर्ष स्वागत यात्रा, प्रभातफेरी काढल्या जातात. याप्रसंगी मुली, महिला, तसेच पुरुष मंडळीही पारंपरिक पोषाख घालून स्वागतयात्रांमध्ये सहभागी होतात. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाते. गुढीला लागणार्‍या हार-कड्यांना मागणी वाढली आहे. हार-कड्यांच्या किमती वाढल्याचे चित्र आहे. तयार मिनी गुढ्यांना पसंती मिळत असून, देवघरात या गुढ्यांचे पूजन केले जाते. तयार गुढीवस्त्रांंनाही बाजारात मागणी आहे.

असे करावे पूजन…

घराच्या प्रवेशद्वारापाशी किंवा खिडकीत, जिथे बाहेरून सर्वांना दिसेल अशा उंच जागी गुढी उभारावी. तेथील जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. मध्यम उंचीची बांबूची काठी स्वच्छ धुऊन घ्या.
काठीच्या वरच्या टोकाला नवीन रेशमी वस्त्र (शक्यतो पिवळे, लाल किंवा जरीचे काठ असलेली साडी/खण) बांधा. त्या वस्त्रासोबत साखरेची गाठी, कडुनिंबाची छोटी फांदी व आंब्याची पाने एकत्र करून बांधा. झेंडूच्या फुलांचा हार गुढीला अर्पण करावा. सर्वार्ंत शेवटी काठीच्या टोकावर तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या (कलश) उपडा ठेवा. या तांब्यावर कुंकवाची पाच बोटे (स्वस्तिक) ओढावीत.

Excitement in the market on the occasion of Gudi Padwa

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *