सप्तशृंगीदेवी यात्रेचे समन्वयातून नियोजन करा : जिल्हाधिकारी

नाशिक : प्रतिनिधी
वणी गड येथील श्री सप्तशृंगीदेवी चैत्र पौर्णिमा यात्रा 26 मार्च ते 2 एप्रिल 2026 दरम्यान होणार असून, भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व यंत्रणांनी समन्वयातून सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार असल्याने गडावर व पायथ्याशी वैद्यकीय पथके, प्राथमिक उपचार केंद्रे आणि रुग्णवाहिका सेवा 24 तास सज्ज ठेवण्याच्या सूचना
देण्यात आल्या.
अग्निशमन दल, पोलीस, होमगार्ड व स्वयंसेवक यांची संयुक्त पथके तैनात ठेवून सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यावर भर
देण्यात आला.
गर्दी नियंत्रणासाठी बॅरिकेडिंग, रांग व्यवस्थापन व सीसीटीव्ही प्रणाली कार्यान्वित ठेवण्याचे
निर्देश देण्यात आले. हरवलेल्या व्यक्तींसाठी स्वतंत्र मदत केंद्र सुरू करण्यासही सांगण्यात आले. तसेच भाविकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छता, वीजपुरवठा, स्वच्छतागृहे, रॅम्प, व्हीलचेअर आदी सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.
वाहतूक व्यवस्थेसंदर्भात गडावर खासगी वाहनांना प्रवेश बंद ठेवून नांदुरी येथे पार्किंगची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. बसेससाठी स्वतंत्र पार्किंग उपलब्ध करून दिले जाणार आहे. कळवण उपजिल्हा रुग्णालयामार्फत वैद्यकीय सेवा सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन मॉकड्रिल आयोजित करण्याचे निर्देशही देण्यात आले.

सुरक्षा व वाहतूक नियोजन

पगडावर खासगी वाहनांना प्रवेश बंद पनांदुरी येथे पार्किंग व्यवस्था
पसीसीटीव्ही व बॅरिकेडिंगद्वारे गर्दी नियंत्रण पपोलीस, होमगार्ड व स्वयंसेवकांची संयुक्त पथके पआपत्कालीन परिस्थितीसाठी मॉकड्रिल व पर्यायी मार्ग व्यवस्था

यात्रेतील महत्त्वाच्या सुविधा

प24 तास वैद्यकीय पथके व रुग्णवाहिका पप्राथमिक उपचार केंद्रांची व्यवस्था पपिण्याचे पाणी, स्वच्छता व वीजपुरवठा पस्वच्छतागृहे, व्हीलचेअर व रॅम्प सुविधा पहरवलेल्या व्यक्तींसाठी मदत केंद्र

Plan Saptashrungi Devi Yatra in a coordinated manner: District Collector

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *