मनपा प्रशासनाने ब्लॅक स्पॉट टीम नेमण्याची नागरिकांची मागणी
सातपूर : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात ब्लॅक स्पॉट म्हणजेच प्रभागात कोणी घाण टाकू नये यासाठी कर्मचारी नेमलेले होते, मात्र त्या संपूर्ण ब्लॅक स्पॉट नियोजनाचे धिंडवडे आज कामगारनगरमधील सुयोग कॉलनी परिसरात काही नागरिकांनी कचरा जाळल्यामुळे एक भली मोठी आग लागली. त्यात एका नागरिकाचे घर जळताना वाचले आहे. मुळातच नागरिकांच्या सतर्कतेमुळे तसेच अग्निशमन विभाग तसेच पोलीस प्रशासनाच्या 112 डॉट लाइनमुळे एका नागरिकाचे घर उद्ध्वस्त होताना वाचले आहे.
मिळालेली माहिती अशी की, कामगारनगरातील सुयोग कॉलनीजवळ कॅनॉल रोड परिसरात कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अचानक कचरा पेटवून दिल्याने गवत मोठ्या प्रमाणात जळून खाक झाल्याने भर उन्हात मोठी आग पसरली.
दरम्यान, या घटनेची परिसरातील स्थानिक युवकांनी आग विझवण्याचा प्रयत्न करून तात्काळ सातपूर पोलिसांना तसेच अग्निशमन विभागाला संपर्क केल्यामुळे अग्निशमन दल वेळीच हजर झाल्यामुळे आग विझवून आटोक्यात आली. याविषयी अधिक माहिती अग्निशमन विभागाने दिली. असाच एक प्रकार काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ चौक येथील महावितरण केंद्राच्या परिसरात अशीच एक आग लागली होती. मनपा प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुन्हा एकदा ब्लॅक स्पॉट पथक नेमण्याची गरज सध्या भासत असल्यास चिन्ह निर्माण झाले आहे. याप्रसंगी सातपूर अग्निशमन विभागाचे फायरमन विजय ठाकूर, विजय वाहुळे, रोशन गांगुर्डे, उमेश गावित, स्वप्नील गांगुर्डे तसेच स्थानिक नागरिक नाना आहेर, सचिन ठोंबरे आदी
उपस्थित होते.
A garbage dump suddenly caught fire in Kamgar Nagar