भोंदू अशोक खरातला शिंदेंचा 17, तर पाटील, तटकरेंचा 8 वेळा फोन

अंजली दमानियांनी कॉल डिटेल्सची यादीच दिली

मुंबई :
शेकडो महिलांचे लैंगिक शोषण व फसवणुकीचे गंभीर आरोप असलेला भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्यातील मोठ्या नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे, आशिष शेलार यांच्यासह अन्य नेत्यांचे खरातसोबतच्या संभाषणाची कॉल डिटेल्सची कॉपी अंजली दमानिया यांना मिळाली आहे. ती कॉपी डीजी आणि मुख्यमंत्र्यांना पाठवली असून याबाबत एसआयटीच्या चौकशी अधिकारी तेजस्वी सातपुते यांनाही माहिती दिली आहे, असा दावा दमानिया यांनी केला आहे.
या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नावही जोडले जात होते. त्यांचेही अशोक खरात याच्याशी 17 कॉल झालेले आहेत. या 17 कॉलपैकी 10 इनकमिंग आणि 7 आउटगोइंग कॉल आहेत. सर्वाधिक संभाषण 21 मिनिटांचे झालेले आहे. जर उपमुख्यमंत्री शिंदे अशा व्यक्तीशी 17 वेळा बोलत असतील, तर ते कशासाठी झाले याचे उत्तर त्यांनी देणे गरजेचे आहे, असे दमानिया यांनी यांनी म्हटले आहे.
भाजपच्या या नेत्यांचेही कॉल तसेच भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी अशोक खरात यांना आठ वेळा कॉल केले आहेत. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनीही आठ कॉल केले आहेत, तसेच भाजपचे आशिष शेलार यांचाही एक कॉल त्यांना गेलेला आहे. ही फक्त नॉर्मल कॉलची माहिती आहे. व्हॉट्सअ‍ॅप कॉलची माहिती उपलब्ध नाही. जर नॉर्मल कॉल इतके झाले असतील, तर व्हॉट्सअ‍ॅप कॉल किती झाले असतील याची कल्पनाही करता येत नाही, असेही दमानिया यांनी म्हटले आहे. रूपाली चाकणकर खरातसोबत 33,727 सेकंद काय बोलल्या? या सर्व कॉलमध्ये सर्वाधिक संभाषण तृप्ती खरात यांच्याशी झाले आहे, जे घरचे असल्यामुळे ते स्वाभाविक मानता येईल. मात्र, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे रूपाली चाकणकर यांचा नंबर दुसर्‍या क्रमांकावर आहे. रूपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात नेमके काय संभाषण झाले, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. तिसरे नाव दीपक लोंढे यांचे आहे. लोंढे हे दीपक केसरकर यांचे अतिशय जवळचे व्यक्ती मानले जातात. त्यांच्या आणि अशोक खरात यांच्यात 190 कॉल झालेले आहेत, आणि एकूण 30,529 सेकंद संभाषण झालेले आहे. यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे खरात यांना राज्याबाहेरूनच नव्हे तर परदेशातूनही कॉल येत होते. कतार, यूएई, ऑस्ट्रेलिया आणि ओमान अशा देशांतूनही त्यांना फोन येत होते. ही सर्व माहिती एसआयटीकडे दिलेली आहे. आता या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.

Impostor Ashok Kharat called Shinde 17 times, while Patil and Tatkare called him 8 times.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *