दि. 5 ते 11 एप्रिल 2026
पुरुषोत्तम नाईक
मेष : लाभ होतील
या सप्ताहात बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. बुधाचे 10 एप्रिलला मीनेत राश्यांतर होत आहे. शनिची साडेसाती, गुरू संमिश्र आहे. रवी, मंगळ प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च मोठ्या प्रमाणात वाढतील. नोकरदारांवर वरिष्ठ नाराज राहतील. शेअरमध्ये लाभ होतील. व्यापारी, व्यावसायिकांनी महत्त्वाची कामे दि. 9 एप्रिलपर्यंतच करावीत. आरोग्याबाबत दक्ष राहा. वाहन जपून चालवा.
वृषभ : यशप्राप्ती होईल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शनि अनुकूल आहेत. शुक्र, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. मात्र, मदतीचा हात मिळू शकतो. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल.
मिथुन : व्यवसायवृद्धी होईल
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, शनि प्रतिकूल आहे. चंद्रभ्रमणे प्रतिकूल आहेत. नोकरदारांच्या मनस्ताप वाढविणार्या घटना घडतील. व्यापारी, व्यावसायिकांची व्यवसायवृद्धी होईल. शेअरमध्ये लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनावर संयम ठेवा. वादविवाद टाळा, प्रकृती जपा.
कर्क : पदोन्नती मिळेल
या सप्ताहात रवी, मंगळ, शुक्र, शनि अनुकूल आहेत. बुध, गुरू, राहू, केतू अनुकूल आहेत. 10 एप्रिलला बुध अनुकूल होईल. चंद्रभ्रमणे संमिन आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात अडथळे येतील. नोकरदारांना पदोन्नती मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांचे निर्रय चुकतील.
सिंह : मनासारखे घडेल
या सप्ताहात गुरू, बुध, शुक्र अनुकूल आहेत. रवी, मंगळ, शनि, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक अडचणीतून वाटचाल करावी लागेल. खर्च वाढतील. नोकरदारांना व व्यापारी, व्यावसायिकांना अनुकूलता प्राप्त होईल. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात मनासारखे घडेल. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. आरोग्य जपा.
कन्या : पैशांची आवक वाढेल
या सप्ताहात मंगळ, बुध, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, शुक्र, राहू, केतू प्रतिकूल आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. खर्च वाढेल. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांनी निर्णय सावधपणे घ्यावेत. प्रकृती जपा.
तूळ : जोरदार आगेकूच
या सप्ताहात बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. रवी, मंगळ, शनि प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक समृद्धी प्राप्त होईल. खर्च नियंत्रणात राहतील. शासकीय, कोर्ट-कचेरीचे निर्णय मनाप्रमाणे लागतील. नोकरदारांना बढती मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल.
वृश्चिक : विवंचना मिटतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शनि अनुकूल आहेत. गुरू, शुक्र, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. विवंचना मिटतील. नोकरदार व व्यापारी, व्यावायिकांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. आरोग्य प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नये.
धनु : आडाखे अचूक ठरतील
या सप्ताहात बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, मंगळ, शनि प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमरे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्तिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. कौटुंबिक वादविवाद समझोत्याने टाळा, मतभेद टोकाला जाऊ देऊ नका. व्यापारी, व्यावसायिकांचे आडाखे अचूक ठरतील. नोकरदारांवर अकारण बालंट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मकर : सौख्यप्राप्ती होईल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळतील. नोकरदारांना पदोन्नती मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांचे येणे वसूल होईल. सौख्यप्राप्ती होईल. आरोग्य जपा.
कुंभ : अचानक धनलाभ
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना अचानक धनलाभ होईल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. व्यापारी, व्यावसायिकांनी निर्णय लांबणीवर टाकावे. आप्तस्वकीयांच्या भेटीगाठी होतील. मतभेद मिटतील.
मीन : आर्थिक समृद्धी
या सप्ताहात शुक्र अनुकूल आहे. शनिची साडेसाती, रवी, मंगळ, बुध, गुरू, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक समृद्धी प्राप्त होईल. खर्च वाढेल. नोकरदारांना दिलासा मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांचे निर्णय चुकतील. विरोधकांच्या कारवायांवर लक्ष ठेवा. आरोग्य चांगले राहील.
Weekly Horoscope