सिडको : विशेष प्रतिनिधी
लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तथाकथित पत्रकार रवींद्र नारायण एरंडे (वय 63, रा. नीलकंठेश्वरनगर, अशोकनगर, सातपूर) याला पोलिसांनी ताब्यात घेत कारवाईचा धाक दाखवला आहे. एरंडे याच्या कार्यालयातून हार्ड डिस्क चोरीला गेल्यानंतर कथित लैंगिक शोषणाचा प्रकार समोर आल्याचे समजते. दरम्यान, संशयित आरोपीकडून तपासकामी सहकार्य मिळत नसल्याने अखेर पोलिसांनी त्याला बालेकिल्ला दाखवला. यावेळी त्याने हात जोडून ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ म्हटले
या प्रकरणात न्यायालयाने सुरुवातीला एरंडे याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पुढील तपासासाठी आणखी चार दिवसांची कोठडी देण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी एरंडे याच्या निवासस्थानी झडती घेतली असता, काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या. यामध्ये प्राण्यांचे अवयव, कवड्या तसेच सापाची कात यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. या आढळलेल्या वस्तूंमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, काहीजण याची तुलना यापूर्वीच्या भोंदूगिरीशी संबंधित प्रकरणांशी करत आहेत. तपासादरम्यान एरंडे याला शहर पोलिसांच्या युनिट-1 कार्यालयात आणण्यात आले होते. तेथून बाहेर पडताना त्याने हात जोडून प्रतिक्रिया दिल्याचे एका व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तो नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला असल्याचे म्हणताना दिसतो. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, पोलीस विविध अंगांनी चौकशी करत आहेत. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली
जात आहे.
Castor oil shown the ‘fortress of law’