दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यात गेल्या महिनाभरापासून वन विभागाच्या दोन्ही कार्य केंद्रांत वणवे लागून वनसंपदा बेचिराख झाली आहे. झरी, करंजखेड, बोरवठ, कोटंबी, अंधृटे, भुवन, भायगाव, आसदनपाड, पेठ महादेवाची दरी, धुळघाट बेंहडमाळ, देवगाव आदींसह ठिकठिकाणी वणवे लागून लहानमोठ्या झुडपांसह रानमेवा, पशुपक्षी, वन्यजीव आदी कित्येकांचे जीव गेलेत. काही सैरावैरा झाले आहेत. तरीही वन विभाग झोपेचे सोंग घेत आहे. नवव्यांदा आगीत कित्येक पशुपक्ष्यांची घरटी, तर सरपटणारे प्राणी आगीत खाक झाले. आड येथील जंगलाच्या वणव्यात मोर व त्यांची पिल्ले मृत्युमुखी पडल्याचे सांगण्यात येते. जगंली वनौैषधी वृक्ष, वन विभागाने लावलेली लहानमोठी झाडे आगीत होरपळून निघाली. वनसंपदेच्या झालेल्या नुकसानीची अधिकृत माहिती उपलब्ध नसली, तरी ती दडवली जात असल्याचे आढळून येत आहे.
Wild fruits bloom and wildfires wreak havoc