शुक्रवार, २७ मे २०२२.
वैशाख कृष्ण द्वादशी. वसंत ऋतू. शुभकृत नाम संवत्सर. राशिभविष्य –
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज दुपारी १२.०० पर्यंत चांगला दिवस आहे” आज ‘सौभाग्य’ योग आहे.
चंद्र नक्षत्र – अश्विनी. चंद्र राशी ‘मेष’
मेष:- तुमच्याच राशीत आज चंद्र शुक्र युती होत आहे. प्राणयरम्य दिवस आहे. भौतिक सुखे प्राप्त होतील.
वृषभ:- आरोग्य सांभाळा. मानसिक शांततेची गरज भासेल. व्यसने आणि प्रलोभने टाळा.
मिथुन:- उत्तम आर्थिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील. मौल्यवान खरेदी होईल.
कर्क:- आनंदी दिवस आहे. मात्र काळजीपूर्वक निर्णय घ्या. मन शांत ठेवा. कामाच्या ठिकाणी उत्साहवर्धक घटना घडतील.
सिंह:- अचानक धनलाभ होऊ शकतो. सूचक घटना घडतील. गुंतवणूकीतून लाभ होतील.
कन्या:- दगदग जाणवेल. प्रवासात काळजी घ्या. विंचू काट्यापासून सावध रहा. स्त्री धन सांभाळा.
तुळ:- विरोधक पराभूत होतील. यश मिळेल. आरोग्य संभाळा. विवाह इच्छुकांना खुशखबर मिळेल. कुटुंबास वेळ द्याल.
वृश्चिक:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. अचानक धनलाभ होतील. संधी चालून येतील.
धनु:- संमिश्र दिवस आहे. काळजी वाढवणाऱ्या घटना घडू शकतात. तरीही दिवस आनंदात जाईल.
मकर:- वाद विवाद टाळा. इतरांना समजून घ्या. अनामिक भय दाटून येईल. छोटे मोठे चिंतेचे प्रसंग येतील.
कुंभ:- सौख्याचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. प्रसन्न वाटेल.
मीन:- कलाकारांना उत्तम दिवस आहे. गायकांना नवीन संधी मिळतील. चैनीवर खर्च कराल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
|
|