निमाणी बसस्थानकात चोरी करणार्‍या दोन महिलांना ठोकल्या बेड्या

दोन लाखांचे सोन्याचे दागिने जप्त; पंचवटी गुन्हे शाखेची कामगिरी

पंचवटी : प्रतिनिधी
निमाणी बसस्थानकात चोरी करणार्‍या दोन महिलांना जेरबंद करण्यात यश आले असून, पंचवटी पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेने ही कामगिरी बजावली आहे.
दरम्यान, सदरच्या महिलांकडून 1 लाख 90 हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहे.
निमाणी बसस्थानक गर्दीचे ठिकाण असल्याने व उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने गर्दीचा फायदा घेऊन या ठिकाणी दागिने चोरीच्या घटना घडत असल्याने त्यावर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीने व गुन्हेगारांवर सापळा लावून कार्यवाही करणे, साध्या वेशात गुन्हे प्रतिबंध पेट्रोलिंग करून कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध अधिकारी व अंमलदार पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यातील फिर्यादी हे त्याच्या वडील, आई, मुलगी, मुलगा अशांना सुरगाणा येथे जायचे असल्याने फिर्यादी त्यांना सोडविण्यासाठी निमाणी बसस्थानक, पंचवटी, नाशिक येथे आले असता, महिला आरोपी निर्मला अशोक कसबे उर्फ निर्मला विजय लोंढे (वय 40, रा. संसरीगाव, गोडसे प्लॉट, देवळाली कॅम्प, नाशिक), ताराबाई मदन खराळे (52, रा. संसरीगाव, गोडसे प्लॉट, देवळाली कॅम्प) या दोघींनी फिर्यादीच्या आईस धारदार वस्तूने मानेला, पाठीला व उजव्या हातास जखमी करून गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून, तोडून नेले. तसेच फिर्यादी व गजानन भगवान चव्हाण (43, रा. पाथर्डी फाटा, गवळाणे रोड, एस. टी. थॉमस स्कूल, लक्ष्मी रो-हाउस नं. 3) यांचा मोबाइल चोरून नेला. गुन्हे शोध पथकाच्या अधिकार्‍यांनी निमाणी बसस्थानकातून महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक विचारपूस केली असता, पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे. आरोपी महिलांकडून 1 लाख 90 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस सतीश शिरसाठ करत आहेत.

यांनी बजाविली कामगिरी

ही उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ एक मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग शेखर देशमुख, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाठ, पोलीस हवालदार अमोल काळे, महेश नांदुर्डीकर, संतोष पवार, पोलीस नाईक जयवंत लोणारे, अंमलदार युवराज गायकवाड, वैभव परदेशी, सचिन बाहिकर, अमोल देशमुख, अंकुश काळे, नितीन पवार, आगोणे, बोरसे पाटील, रोहिणी भोईर यांनी पार पाडली.

Two women arrested for stealing at Nimani bus stand

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *