साप्ताहिक राशिभविष्य

दि. 17 ते 23 मे 2026
पुरुषोत्तम नाईक

मेष : आर्थिक समृध्दी
या सप्ताहात मंगळ, रवी, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू संमिश्र आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. धनचिंतांना उतार पडेल. खर्च वाढतील. चुका उघडकीस येतील. व्यापारी, व्यावसायिकांना आर्थिक समृध्दी प्राप्त होईल. नवीन मित्र-मैत्रिणी भेटतील. नवीन ओळखी होतील. मनावर ताबा ठेवणे आवश्यक ठरेल. प्रकृती चांगली राहील.
वृषभ : पैशांचे नवे स्त्रोत सुरू होतील
या सप्ताहात बुध, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांचे नवे स्त्रोत सुरू होतील. नोकरदारांना अडचणी त्रस्त करतील. व्यापारी, व्यावसायिकांच्या योजना वेग पकडतील. शेअरमध्ये लाभ होतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यश प्राप्ती होईल. आरोग्य चांगले राहील.
मिथुन : निर्णय चुकतील
या सप्ताहात मंगळ, शुक्र, शनि, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, बुध प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. धनचिंता भेडसावतील. पैसे वसूल होणार नाहीत. नोकरदारांवर कामाचा ताण पडेल. व्यापारी, व्यावसायिकांचे निर्णय चुकतील. मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. आरोग्य प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका.
कर्क : गणिते जुळतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शनि अनुकूल आहेत. गुरू, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांच्या कामांना वेग प्राप्त होईल. व्यापारी, व्यावसायिकांची आर्थिक गणिते जुळतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामांमधील अडचणी त्रस्त करतील. अध्यात्मात मन रमेल. शारीरिक व्याधी त्रस्त करतील.
सिंह : यशप्राप्ती होईल
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. रवी, शनि, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांची कामासाठी धावपळ होईल. व्यापारी, व्यावसायिकांना अडचणीतून वाटचाल करावी लागेल. शासकीय, कोर्ट कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. आरोग्य प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे अडचणीचे ठरेल. कुपथ्य टाळा.
कन्या : जोरदार आगेकूच
या सप्ताहात रवी, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. जुनी येणी वसूल होतील. नोकरदारांची प्रगती होईल. वाद टाळा. सहकार्‍यांशी समझोत्याचे धोरण ठेवा. व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. प्रवास टाळा. वाहने जपून चालवा. आरोग्याची काळजी घ्या. कुपथ्य टाळा.
तूळ : अनुकूलता प्राप्त होईल
या सप्ताहात मंगळ, गुरू, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, बुध, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांची आर्थिक समिकरणे विस्कटतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात अनुकूलता प्राप्त होईल. आरोग्यप्रश्नाकंडे दुर्लक्ष करणे त्रासदायक ठरेल. कुपथ्य टाळा.
वृश्चिक : अडचणी सतावतील
या सप्ताहात बुध, शनि अनुकूल आहेत. रवी, मंगळ, गुरू, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च मोठ्या प्रमाणात वाढतील. नोकरदारांना संकटांना तोंड द्यावे लागेल. व्यापारी, व्यावसायिकांनी महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकावे. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात अडचणी येतील. आरोग्य प्रश्न त्रस्त करतील.
धनु : आर्थिक समस्या
या सप्ताहात शुक्र, मंगळ, बुध, गुरू, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे प्रतिकुल आहेत. या सप्ताहात आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागेल. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांना जास्त काम करावे लागेल. व्यापारी, व्यावसायिकांची अपेक्षित कामे होणार नाहीत. विरोधकांच्या कारवायांकहे दुर्लक्ष करू नका. आरोग्याची काळजी घ्या.
मकर : सुखवार्ता कळतील
या सप्ताहात रवी, बुध, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. मंगळ, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांसाठी परिस्थिती त्रासदायक राहील. वाद टाळा, मनावर संयम ठेवा. व्यापारी, व्यावसायिकांना सुखवार्ता कळतील. आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ : मंगलवार्ता कळतील
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना मंगलवार्ता कळतील. व्यापारी, व्यावसायिकांनी महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावे. मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कौटुंबिक वाद सामंजस्याने मिटवा. प्रकृती सांभाळा.
मीन : आर्थिक सुधारणा
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, राहू, केतू, गुरू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती सुधारणा होईल. येणे पैसे वसूल होतील. नोकरदारांच्या अडचणी दूर होतील. व्यापारी, व्यावसायिकांच्या योजना यशस्वी होतील. मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. प्रकृती जपा.

Weekly Horoscope

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *