पंचवटीत विवाहितेवर अत्याचाराचा प्रयत्न

मुलांना जिवे मारण्याची धमकी

पंचवटी : विशेष प्रतिनिधी
पंचवटी परिसरातील जाधव कॉलनी, मखमलाबाद रोड येथे एका 28 वर्षीय विवाहित महिलेस घरात एकटी असताना अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घरी एकटी असताना तिची दोन मुले घराबाहेर खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी पेठरोड परिसरातील संशयित तिच्या घरी आला. घरातील किचन ओट्यावर असलेला भाजी कापण्याचा चाकू हातात घेऊन त्याने महिलेला धमकावत, “मी मोठ्या अपेक्षेने आलो आहे, तू मला नकार देऊ नकोस. नाही म्हटले तर तुझ्या दोन्ही मुलांना मारून टाकीन,” अशी धमकी दिली. महिलेने विरोध केला असता संशयिताने तिच्यावर जबरदस्तीचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात
आले आहे.
घटनेनंतर संशयिताने महिलेला दोन दिवसांचा अवधी देत “तुझी काय इच्छा आहे ते सांग,” असे म्हणत तेथून पळ काढला. या प्रकारामुळे मानसिक धक्का बसलेल्या महिलेने 21 मे रोजी दुपारी फिनाइल प्राशन केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास पंचवटी पोलीस
करीत आहेत.

Attempted rape on married woman in Panchavati

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *