सिडको : प्रतिनिधी
गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक, अनधिकृत कत्तल आणि बेकायदेशीर कत्तलखान्यांना प्रतिबंध घालण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात आंतरविभागीय समन्वय बैठक पार पडली. पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संबंधित विभागांमध्ये समन्वय वाढवून संयुक्त कारवाई करण्यावर भर देण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक, अवैध कत्तल तसेच अनधिकृत कत्तलखान्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई प्रभावीपणे राबविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत संबंधित कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी, संशयित वाहनांवर लक्ष ठेवणे, अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाई करणे आणि विविध विभागांमध्ये अधिक समन्वय निर्माण करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी संबंधित विभागांना त्यांच्या स्तरावर नोडल अधिकार्यांची नियुक्ती करून समन्वयित आणि प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. भविष्यात अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात संयुक्त पद्धतीने कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. या बैठकीस जिल्हाधिकारी नाशिक, नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त, देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, भगूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी, पशुसंवर्धन विभागाचे उपआयुक्त यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके आणि नोडल अधिकारी डॉ. समाधान हिरे यांनीही सहभाग नोंदविला.
The sale of ‘black maine’ from the mountains has given employment to tribal brothers