कांदा दराबाबत दीर्घकालीन धोरण निश्चित करा

मंत्री भुजबळ यांची केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्याकडे मागणी

लासलगाव : वार्ताहर
कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी कांद्याच्या बाजारभावाबाबत स्थिर व दीर्घकालीन धोरण निश्चित करण्यात यावे, अशी आग्रही मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडे दिल्ली येथील बैठकीत केली.
नाफेड व एनसीसीएफमार्फत सुरू असलेली कांदा खरेदी थेट कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकर्‍यांकडून करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी लावून धरली.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत दिल्लीत झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीला केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, शिवराजसिंह चौहान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह महायुतीचे शिष्टमंडळ उपस्थित होते. बैठकीत बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले की, सध्या कांद्याचा उत्पादन खर्च प्रतिक्विंटल 1,500 रुपयांवर गेला आहे. मात्र, जानेवारी 2026 पासून बाजारात कांद्याला केवळ 1,000 रुपये, तर गेल्या महिन्यात अनेक बाजार समित्यांमध्ये 800 रुपयांपेक्षा कमी दर मिळाला. यामुळे शेतकर्‍यांमध्ये प्रचंड असंतोष
आहे. 26 मे 2026 पासून केंद्र सरकारने रब्बी कांदा 1,580 रुपये दराने खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय सकारात्मक असला, तरी खरेदीचा लक्ष्यांक किमान 10 लाख मेट्रिक टनांपर्यंत वाढवणे
गरजेचे आहे.

Determine a long-term policy regarding onion prices

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *