अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभर कारवाई

दोन महिन्यांत 50 गुन्हे : महिलांच्या शोषणाचे प्रमाण अधिक, नाशिक जिल्ह्यात पाच गुन्हे

नाशिक : प्रतिनिधी
राज्यात खळबळ उडवून देणार्‍या भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर सव्वादोन महिन्यात पोलिसांनी राज्यात 50 भोंदूबाबांचा दरबार उधळून लावला आहे. सर्वांत जास्त नाशिक जिल्ह्यात पाच गुन्हे दाखल झाल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, बुवाबाजी संघर्ष विभागाच्या कार्यवाह अ‍ॅड. रंजना गवांदे व सहकार्यवाह विष्णुदास लोणारे यांनी दिली. राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी ही गुन्ह्यांची यादी संकलित केली आहे.
राज्यातील 50 प्रकरणांपैकी बहुतांश प्रकरणांत महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचे समोर आले आहे. पुरोगामी महाराष्ट्रात भोंदूंचे पेव किती फुटले आहे, याची राज्यभर चर्चा चालू आहे. नाशिक येथे घडलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर दोन महिन्यांत राज्यात एकूण 50 गुन्हे दाखल झाले आहेत. पुरोगामी महाराष्ट्राला चिंतेत टाकणारी व विचार करायला लावणारी ही घटना आहे. काही ठिकाणी उत्स्फूर्त, तर काही ठिकाणी अंनिसच्या प्रयत्नाने हे गुन्हे दाखल झाले आहे. या यादीवरून असे लक्षात येते की, बहुतांश सर्वच धर्मांतील भोंदूबाबांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केवळ हिंदू धर्मातच केले जाते, या सनातनी आरोपाला पुन्हा एकदा सणसणीत उत्तर मिळाले आहे.
भोंदूबाबांनी ग्रामीणसह शहरी भागातील महिला व पुरुषांची फसवणूक केल्याचे या घटनांवरून उघड झाले आहे. विशेषतः यात महिलांवरील शारीरिक शोषणासह आर्थिक लुटीचे प्रमाण अधिक आहे. भीतीपोटी व सामाजिक प्रतिष्ठेपोटी अनेक पीडित समोर येण्यास घाबरत आहेत. खरात प्रकरणानंतर पीडित महिलांना लढण्याची हिंमत निर्माण झाली आहे. त्यांना न्यायाची अपेक्षा निर्माण झाली आहे. इतरही आणखी पीडितांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.
अंधश्रद्धेमुळे समाजातील फसवणूक रोखण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने 18 वर्षे लढा दिला. या संघर्षानंतर 2013 मध्ये महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा व त्याचे समूळ उच्चाटन अधिनियम 2013 हा कायदा अस्तित्वात आला. असा कायदा बनविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले होते. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात सरकार अयशस्वी ठरले असले, तरी अंनिस मर्यादा व क्षमता याचा विचार करता, आपल्या पातळीवर त्याचे प्रबोधन, प्रचार-प्रसार करत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत.

या 50 दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपशील असा

1) अशोककुमार खरात, नाशिक 2) गडगेबाबा राजेंद्र गडगे, संगमनेर, अहिल्यानगर 3) चेतन सुनील माळी, मूर्तिजापूर, अकोला 4) पंकज देवराम घोलप, येडगाव, पुणे 5) मोहनमामा भोसले, कुर्डुवाडी, सोलापूर 6) नाना बर्डे, आळे फाटा, पुणे 7) ऋषिकेश वैद्य, वसई, ठाणे 8) अल्ताफ रईस खान, मालाड, मुंबई 9) रिधम पांचाळ, मालाड, मुंबई 10) गणेश शिंदे, श्रीरामपूर, अहिल्यानगर 11) अर्जुन चव्हाण ऊर्फ टनटन बाबा, नवी मुंबई 12) विठोबा वाल्मीक जाट, सातपूर, नाशिक 13) किसन तळपे मंदोशी, खेड 14) महेशगिरी ऊर्फ महेश काकडे, लासलगाव, नाशिक 15) अब्दुल रशीद शेख, खालापूर, रायगड 16) इरफान नियाज अहमद, कांदिवली, मुंबई
17) अनिल सोलोमन सिंग (पादरी), पुणे 18) शिवराम पराश सावर, पालघर 19)अल्ताफ हसन मदारी, जळगाव 20) नाना महाराज ऊर्फ गुरुमाउली वीरकर, टेंभुर्णी, सोलापूर 21) पिंटू धुमाळस बारामती, पुणे 22) हेमदास किसन बावणे, अड्याळ, भंडारा 23) चंद्रकांत राजेंद्र माळी, इगतपुरी, नाशिक 24) अशोक मधुकर आढाव, श्रीरामपूर, अहिल्यानगर 25) औदुंबर गडदे, स्वारगेट, पुणे 26) नवनाथ गवळी, खेड, पुणे 27) शाहिद शेख, खडकपाडा, कल्याण 28) शिव भाऊ सोनवणे, सर्जेपुरा, अहिल्यानगर 29) ज्ञानेश्वर नागोराव कोरडे, बिलोली, नांदेड 30) रमेश गुप्ता, मालाड, मुंबई 31) हरिगिरी दत्तगिरी महाराज, भाग्यनगर, नांदेड 32) मंजुनाथ शेट्टी ऊर्फ दीक्षित, ठाणे 33) कृष्णा ऊर्फ भगत सुभाष चित्ते, पश्चिम देवपूर, धुळे 34) यशवंत एकनाथ थोरात, पारनेर, अहिल्यानगर 35) श्याम महाराज राठोड, दिघी, पुणे 36) सुधाकर गाडगे, बाळापूर, अकोला 37) परमेश्वर ऊर्फ प्रमोद बाळू गायकवाड, उत्तमनगर, पुणे 38) शीतल सालके व पौर्णिमा सारस्वत, भारती विद्यापीठ, पुणे 39) योगेश ऊर्फ भय्या बापू खैरनार, निजामपूर, साक्री, धुळे 40) विठ्ठल पवार, महागाव, यवतमाळ 41) ताहीर रशीद बेग, सक्करदरा, नागपूर 42) सुधाकर रमेश काळे, अंजनगाव सुर्जी, अमरावती 43) अशोक रामधन राठोड, वडगाव (जंगल), यवतमाळ 44) महेश मोहन बाबर, विटा, सांगली 45) कमलेश महाराज अधिकारी, इंदिरानगर, नाशिक 46) परवेज अब्दुल अजीज मेमन, कोंढवा, पुणे 47) गंगाधर बुरांडे, सावली, चंद्रपूर, 48) भीमराव पुंजाराम बिहाडे, छत्रपती संभाजीनगर 49) मुक्तानंदगिरी महाराज ऊर्फ बापू महाराज, कन्नड, छत्रपती संभाजीनगर 50) राजू बन्सी दिवटे, पारनेर, अहिल्यानगर.

Statewide action after Ashok Kharat case

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *