साप्ताहिक राशिभविष्य

दि. 24 ते 30 मे 2026
पुरुषोत्तम नाईक

मेष : जोरदार आगेकूच

या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती या सप्ताहात दि. 1 जून रोजी गुरूचे राश्यांतर होत आहे. गुरू मिथुन राशीतून कर्क राशीत जात आहे. मेष राशीला चवथा गुरू असल्याने प्रतिकुल आहे. नोकरदारांना दिलासा मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत.

वृषभ : मोठा धनलाभ

या सप्ताहात बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. या सप्ताहात प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांना मोठा धनलाभ होईल. शेअरमध्ये लाभ होतील. प्रकृतीची काळजी घ्या.

मिथुन : यशप्राप्ती होईल

या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, शनि, राहू, केतू अनुकूल आहेत.दि. 1 जूनला गुरूचे मिथुनेतून कर्क राशीत राश्यांतर होत आहे. मिथुन राशीला गुरू दुसरा म्हणजेच शुभफलदायी येत असल्याने आर्थिक विवंचनातून सुटका होईल. खर्च वाढतील. नोकरदारांच्या कामाचा वेग वाढेल. व्यापारी, व्यावसायिकांचे आडाखे अचूक ठरतील. कोर्ट कचेरीकामात यश येईल.

कर्क : वाद टाळा

या सप्ताहात रवी, मंगळ, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. बुध, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. शेअरमध्ये कुठलेही धाडस करू नका. नोकरदारांनी सहकार्‍यांशी वाद, संघर्ष टाळावा. व्यापारी व्यावसायिकांनी नवीन उद्योगव्यवसाय सुरू करणे लांबणीवर टाकावे.

सिंह : व्यवसायवृद्धी

या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनि, राहू, केतू, गुरू, रवी प्रतिकुल आहेत. दि. 1 जूनला गुरूचे मिथुनेतून कर्क राशीत राश्यांतर होत आहे. त्यामुळे सिंह राशीला गुरू बारावा येतो आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. आर्थिक परिस्थिती दोलायमान राहील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांची व्यवसायवृध्दी होईल. शेअरमध्ये लाभ होतील.

कन्या : पगारवाढ मिळेल

या सप्ताहात रवी, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. गुरूच्या कर्केतील राश्यांतरामुळे गुरू अकरावा येत आहे. कडक उन्हात वाटचाल करताना शीलत आम्रतरुची छाया मिळावी अशी परिस्थिती होईल. नोकरदारांना पगारवाढ मिळेल.

तूळ : आर्थिक दिलासा

या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. नोकरदारांना कामाचे दडपण येईल. व्यापारी, व्यावसायिकांची समिकरणे जुळतील. विरोधकांच्या कारवाया त्रस्त करतील. मनावर संयम ठेवा. वाद टाळा, आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक : धनचिंता उतार

या सप्ताहात गुरू, शनि अनुकूल आहेत. रवी, मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूूल आहेत. दि. 1 जूनला गुरूचे कर्केत राश्यांतर होत आहे. गुरू भाग्यस्थानात नववा येतो आहे. या सप्ताहात आर्थिक सुधारणा होतील. धनलाभाचे प्रसंग येतील. धनचिंतांना उतार पडेल. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांची गणिते चुकतील.

धनु : बढती मिळेल

या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, गुरू, शनि प्रतिकुल आहेत. दि. 1 जूनला होणार्‍या गुरूच्या राश्यांतरामुळे गुरू आठवा येतो आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना बढती मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांचे आडाखे अचूक ठरतील. प्रकृती जपा.

मकर : प्रगती होईल

या सप्ताहात रवी, बुध, गुरू, शनि अनुकूल आहेत. मंगळ, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. दि. 1 जूनला गुरूचे कर्क राशीत राश्यांतर होत आहे. गुरू सातवा येत असल्याने प्रगतीची कावाडे उघडतील. मानसिक चिंता दूर होतील. नोकरदारांनी सावध भूमिका ठेवणे आवश्यक राहील. व्यापारी, व्यावसायिकांची कामे होतील.

कुंभ : सुखवार्ता कळतील

या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती गुरू संमिश्र आहे. रवी, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांचे धाडस यशस्वी होईल. व्यापारी, व्यावसायिकांना सुखवार्ता कळतील. कौटुंबिक वाद टाळा, प्रकृती जपा.

मीन : आर्थिक समृद्धी

या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, राहू, केतू प्रतिकुल आहेत.चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक समृध्दी प्राप्त होईल. शासकीय कोर्ट, कचेरीच्या कामात दिलासा मिळेल. नोकरदारांच्या अडचणी दूर होतील. व्यापारी, व्यावसायिकांना आनंदवार्ता कळतील. खर्च वाढतील. आरोग्य चांगले राहील.

Weekly Horoscope

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *