वसाका कारखान्यातून इलेक्ट्रिक वेल्डिंग मशिनची चोरी

सुरक्षारक्षकांनी एकाला पकडले, दोन फरार

देवळा : प्रतिनिधी
तालुक्यातील कसमादेचे वैभव असलेल्या विठेवाडी येथील गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यातून दि. 29 मे रोजी रात्रीच्या सुमारास इलेक्ट्रिक वेल्डिंग मशिनची चोरी करताना कारखान्याच्या सुरक्षारक्षकांना एका चोरट्याला रंगेहाथ पकडण्यात यश आले, तर दोन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळाले.
कारखान्याच्या परिसरात सुरक्षारक्षक पेट्रोलिंग करत असताना त्यांना लोखंडाचा आवाज आल्याने त्यांनी आत जाऊन पाहिले असता, तिघे चोरटे कारखान्याच्या मशिनरी विभागातून वेल्डिंग मशिनची चोरी करताना दिसले. त्यांनी त्यांचा पाठलाग केला असता दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले, पण त्यांच्याबरोबर असलेल्या एका आरोपीला पकडण्यात सुरक्षारक्षकांना यश आले. त्यास देवळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. फरार असलेल्या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.

कारखाना बंद असल्याने मोठ्या प्रमाणात चोर्‍या होण्याचे प्रमाण वाढले आहे. कारखान्यातील वेल्डिंग मशिन फोडून, वीजपंप काढून त्यातील शेकडो रुपयांच्या वायर चोरीला जात आहेत. मोठमोठे विद्युत जनित्र काढून त्यातील लाखो रुपयांचे तांबे काढून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. हजारो लिटर किमतीचे ऑइल चोरी झाल्याचा अंदाज होत आहे.
– कुबेर जाधव, राज्य समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Electric welding machine stolen from Wasaka factory

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *