अनधिकृत नळकनेक्शन धारकांवर सिन्नर नगर परिषदेची कारवाई

50 मालमत्तांची तपासणी; 8 जणांची नळजोडणी बंद

सिन्नर : प्रतिनिधी
शहरातील अनधिकृत पिण्याच्या पाण्याच्या कनेक्शनविरोधात सिन्नर नगर परिषद प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील विविध भागांत तपासणी मोहीम राबवत 50 मालमत्तांची पाहणी करण्यात आली आहे. त्यांपैकी आठ मालमत्तांचे नळकनेक्शन बंद करण्यात आले.
नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, पाणीपुरवठा सभापती पंकज मोरे आणि मुख्याधिकारी अभिजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अनधिकृत नळ कनेक्शनचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली होती.
प्रशासनाने यापूर्वी सोशल मीडिया, वृत्तपत्रे तसेच शहरातील सर्व 15 प्रभागांमध्ये रिक्षाद्वारे जनजागृती करून नागरिकांना अनधिकृत पाणी कनेक्शन अधिकृत करून घेण्याचे आवाहन केले होते. मात्र अनेक नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली.
मुख्याधिकारी अभिजीत कदम, पाणीपुरवठा अभियंता प्रशांत मेश्राम व नगरपरिषद कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत वृंदावननगर, प्रकाशनगर, शांतीनगर आणि शनिमंदिर परिसरात तपासणी मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत 50 मालमत्तांची पडताळणी करण्यात आली आहे. आठ अनधिकृत नळकनेक्शन तत्काळ बंद करण्यात आले.
ही मोहीम पुढील काळात संपूर्ण शहरात सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शहरातील सर्व अनधिकृत नळकनेक्शनधारकांनी आपले कनेक्शन तातडीने अधिकृत करून घ्यावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
या कारवाईदरम्यान फकिरा उगले, किरण बोंबले, हेमंत जाधव, संजय बालवे, स्वप्नील पाटील व दत्तात्रय जगताप यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

 

 

Sinnar Municipal Council takes action against unauthorized water connection holders

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *