लिंबांना जास्त दिवस ताजे ठेवण्यासाठी.
उन्हाळयात लिंबू सरबत आरोग्यासाठी फार ऊर्जादायक असते. त्यासाठी लिंबू बाजारातून आणल्यावर ते लवकरच कडक होऊन चवहीन होतात. त्यासाठी लिंबांना नीट धुवून व नंतर पुसून त्यांना नारळाचे तेल लावल्यास व फ्रीजमध्ये ठेवल्यास ते बरेच दिवस ताजे राहातात.
टोमॅटोचा पल्प पटकन काढण्यासाठी
टोमॅटोचा पल्प काढण्यासाठी कुकरमध्ये मीठ व पाण्यात उकळावे. त्यानंतर त्याची साल पटकन काढता येते. याचा उपयोग टोमॅटो सूप, ग्रेवी व ज्यूससाठी करता येतो.
इडली नरम, मुलायम बनविण्याकरिता
इडली नरम, मुलायम बनविण्याकरिता इडलीच्या पीठामध्ये एक लहान चमचा व्हिनेगर घालावे. त्यामुळे इडली अतिशय नरम बनते.
लाल तिखट ज्या गृहिणी लाल तिखट, म्हणजेच मिरची पूड घरीच बनवीत असतील, त्यांच्यासाठी ही टीप आहे. मिरच्या मिक्सरवर वाटताना त्यामध्ये थोडेसे मोहोरीचे तेल घातल्याने मिरची पुडीला चांगला रंग येतो.
हे ही वाचा आपली वसुंधरा, आपले आरोग्य
विरजणाशिवाय दही कसं लावावं
जर घरात विरजण नसेल आणि दही लावायचं असल्यास सर्वांत आधी दूध गरम करून घ्या. त्यात लिंबाचा रस घालून पातेलं 10 ते 12 तास झाकून ठेवा. मस्त सायीचं दही लागेल.
भाकरीचे पीठ
भाकरीचे पीठ जुने झाल्यास भाकरी नीट थापता येत नाही, तुटते. अशा वेळी पीठ गरम पाण्याने भिजवून थोडा वेळ झाकून ठेवावे. भाकरी चांगली होते. पुरण शिजवताना त्यामध्ये थोडी दूध पावडर घालावी. म्हणजे रंग चांगला येतो व चवही चांगली लागते..
कढीपत्ता काड्यासहित काचेच्या गलासात पाणी घालून त्यामध्ये ठेवून हवेशीर ठेवल्यास 10 दिवस सहज टिकतो.
पुरण पोळी, गुळाची पोळी किंवा डोसा करायचा असेल तर आधी तव्यावर साधी पोळी करून म्हणजे चिकटत नाही. पुरण शिजवताना त्यामध्ये चिमूटभर खाण्याचा चुना घालावा पोळी फुटत नाही.
टोमॅटो सार करताना त्यामध्ये गाजराच्या फोडी घालाव्या, सार घट्ट होतो…
थोड्या तुपावर रवा टाकून भाजून ठेवावा, कीड लागत नाही.