आपली वसुंधरा, आपले आरोग्य

जागतिक आरोग्य संघटनेने यंदाच्या वर्षी आपली वसुंधरा, आपले आरोग्य ही संकल्पना पुरस्कृत केली गेली आहे. कोरोना कालावधीपासुन आरोग्य संदर्भात जनसामान्यांमध्ये जागरुकता निर्माण झाली आहे. निसर्गाने आयतेच उपलब्ध करुन दिलेले हवा, पाणी, पर्यावरण यांचा आरोग्याशी जवळचा संबंध आहे. सर्व गोष्टी स्वच्छ करण्यासाठी आपण पाण्याचा वापर करतो. पण, पाण्याच्या स्वच्छतेची जबाबदारीसाठी मात्र आपण स्थानिक स्वराज्य संस्थांकडे बघतो. दूषित पाण्यामुळे उलटी, जुलाब तसेच विषमज्वर कावीळ सारखे घातक आजार उद्भवतात. पाणी उकळुण पिणे सारख्या साध्या कृतीसोंबत शेवग्याच्या बीयांचा पाणी शुद्धीकरणातील वापर असे अनेकविध उपाय अंगीकार करता येतात. सामाजिक स्तरावर नदी, नाले व परिसर स्वच्छता हे दीर्घकालिन व तेवढेच महत्वाचे आहे. नाशिक शहरातून वाहणार्या नंदिनी, वाघाडी व इतर नाल्यांमध्ये सर्रास सोडलेले सांडपाणी, मलजल केवळ पाणीच प्रदुषित करत नसुन त्यावर अवलंबुन असलेली एकुणच इकोसिस्टिम बाधीत करत आहे. सजग नागरिक म्हणुन या प्रदुषणाला आळा घालणे हे देखील प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
– डॉ वैभव दातरंगे
सामाजिक आरोग्य सल्लागार सचिव, निमा नाशिक

 

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *