केतन मृत्यूप्रकरणी सिया, चेतनला 3 जुलैपर्यंत कोठडी

पुणे :
लोहगडमधील केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणी त्याची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन यास पोलिसांनी अटक केली. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात बाजू मांडताना तपास पूर्ण झाल्याने अधिकच्या पोलीस कोठडीची गरज नसल्याचे म्हटले. केतन अग्रवाल कुटुंबीयांच्या वतीने आणि सरकारी वकिलांनी तपासातील काही बाबी शिल्लक असल्याचा युक्तिवाद करत पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. त्यानुसार दोन्ही आरोपींना 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपींनी कट रचला असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, गुन्हा कसा केला याचा तपास करायचा आहे. कट कुठं बसून केला हे तपासायचे आहे. सियाप्रमाणे चेतनला घेऊन रिक्रियेशन करायचं आहे. लोहगडावर अनेकांशी संवाद साधला आहे, बालीला प्री वेडिंग शूटला जायचं नव्हतं म्हणून, पासपोर्ट फाडले, तो केतनचा पासपोर्ट शोधायचे आहे. लोहगडावर जाऊन रेकी केली का? हे तपासायचे आहे? या कटात कोणी सहभागी आहे का? केतनचा मोबाईल काही वेळाने देण्यात आला, त्यातील माहिती रिकव्हर करायची आहे, त्यांनी माहिती लपवली आहे, ती मिळवायची आहे. तसेच, चेतनचे कपडे हस्तगत करायचे आहेत, त्यामुळे आरोपींना सात दिवसांची पीसी मिळावी, अशी मागणी पोलिसांच्यावतीने करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने 5 दिवसांची पीसी दिली.

Siya and Chetan remanded to custody until July 3 in connection with Ketan’s death.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *