भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी

मॉस्को/नवी दिल्ली
भारताने यावर्षी जून 2026 मध्ये रशियाकडून विक्रमी प्रमाणात कच्च्या तेलाची आयात केली. ही आयात मागील महिन्याच्या म्हणजेच मे महिन्याच्या तुलनेत 34% अधिक आहे. तथापि, या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती मंदावल्यामुळे रशियाच्या निर्यातीतून मिळणार्‍या उत्पन्नात किंचित घट झाली आहे. ’सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर’ (सीआरईए) ने प्रसिद्ध केलेल्या एका ताज्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, जून महिन्यात भारताने रशियाकडून 4.5 अब्ज युरो किमतीचे कच्चे तेल खरेदी केले. ही खरेदी रशियाकडून होणार्‍या भारताच्या एकूण 5.5 अब्ज युरोच्या इंधन आयातीच्या 83% आहे. या खरेदीमुळे चीननंतर रशियाकडून हायड्रोकार्बन खरेदी करणारा भारत जगातील दुसरा सवार्ंत मोठा देश बनला आहे. जून महिन्यात भारताची एकूण कच्च्या तेलाची आयात मागील महिन्याच्या तुलनेत 5.4 टक्क्यांनी वाढली. या कालावधीत देशातील प्रमुख रिफायनरींना होणार्‍या रशियन तेलाच्या पुरवठ्यात लक्षणीय वाढ झाली.

जागतिक व्यवसायात भारताची मोठी भूमिका

भारत केवळ रशियन तेल खरेदी करत नाही, तर त्यापासून बनवलेल्या शुद्ध इंधनाच्या जागतिक व्यवसायात किंगमेकरची भूमिकाही बजावत आहे. जून महिन्यात, भारत, तुर्की, ब्रुनेई आणि जॉर्जियामधील रिफायनरींनी रशियावर निर्बंध लादलेल्या देशांना (युरोपियन युनियन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया) 814 दशलक्ष युरो किमतीची पेट्रोलियम उत्पादने निर्यात केली. यापैकी 369 दशलक्ष युरो किमतीची उत्पादने रशियन कच्च्या तेलापासून बनवलेली होती.

India’s record oil purchases from Russia

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *