सिडको : विशेष प्रतिनिधी
सिडकोतील लेखानगर परिसरातील स्पॅक्स हॉटेल अँड बारचे शटर वाकवून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम आणि अन्य साहित्य असा एकूण एक लाख 81 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विश्राम श्रीराम यादव (वय 32, रा. स्पॅक्स हॉटेल अँड बार, लेखानगर, सिडको, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. 14 जुलै 2026 रोजी पहाटे 1.30 ते सकाळी 8 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी स्पॅक्स हॉटेल अँड बारच्या समोरील लोखंडी शटर कशाच्यातरी सहाय्याने वाकवून आत प्रवेश केला. त्यानंतर हॉटेलमधील एक लाख 80 हजार रुपयांची रोख रक्कम तसेच सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर, आधार कार्ड आणि विविध बँकांचे डेबिट व क्रेडिट कार्ड असा एकूण एक लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत करीत आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही
फुटेजच्या आधारे अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
Theft of ₹1.81 lakh from Spax Hotel & Bar after bending the shutter.