पावसाळा आणि आयुर्वेद

रिमझिम पडणारा पाऊस, मातीचा तो हवाहवासा वाटणारा सुगंध आणि चहूकडे पसरलेली हिरवीगार शाल… पावसाळा आला की, मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. ग्रीष्म ऋतूतील रखरखीत उकाड्यानंतर येणारा हा ऋतू खर्‍या अर्थाने निसर्गाला आणि मनाला शांत करतो. पण निसर्गाचे हे मनमोहक रूप पाहत असताना, आपण आपल्या आरोग्याकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष करतो. निसर्गात होणार्‍या या अचानक बदलांचा आपल्या शरीरावर खूप मोठा परिणाम होत असतो. म्हणूनच या आल्हाददायक ऋतूत स्वतःची आणि कुटुंबाची काळजी कशी घ्यावी, हे आयुर्वेद अतिशय सोप्या शब्दांत सांगते.
पावसाळ्यात (वर्षा ऋतू) आपली पचनशक्ती (अग्नी) नैसर्गिकरीत्या मंदावलेली असते. उन्हाळ्यात शरीरात साठलेला वातदोष या दिवसांत उफाळून येतो. तसेच हवेतील गारव्यामुळे कफ आणि पाण्यातील बदलांमुळे पित्तदेखील वाढते. यामुळेच सर्दी, खोकला, अपचन, गॅस, सांधेदुखी आणि त्वचेचे विकार डोके वर काढतात.
यावर मात करण्यासाठी नेहमी ताजे, गरम आणि पचायला हलके अन्न खावे. शिळे, थंड आणि पुन्हा पुन्हा गरम केलेले अन्न टाळावे.
आहारात आले, लसूण, जिरे, हिंग, हळद आणि मिरे यांचा वापर वाढवावा. भाज्यांमध्ये भोपळा, पडवळ, कारले, भेंडी यांचा समावेश करावा. वाटाणा, कोबी, बटाटे टाळावेत.
पावसात भिजणे, दिवसा झोपणे आणि अतिश्रम टाळावेत. कोमट तेलाने मालिश करून गरम पाण्याने आंघोळ केल्यास वात शांत होतो. साध्या पाण्याऐवजी उकळून कोमट केलेले पाणी प्यावे. पाणी उकळताना त्यात सुंठ, वाळा किंवा मुस्ता (नागरमोथा) यांसारख्या वनस्पती टाकल्यास पाण्याचे निर्जंतुकीकरण तर होतेच. शिवाय हे पाणी पचनाला अत्यंत हलके आणि आजार दूर ठेवणारे बनते.
पावसाळ्यात दमट हवेमुळे बुरशीजन्य आजार (र्ऋीपसरश्र खपषशलींळेपी), गजकर्ण, चिखल्या यांसारखे त्वचेचे विकार मोठ्या प्रमाणावर वाढतात. आंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाची पाने उकळून ते पाणी वापरल्यास त्वचेचे विकार दूर राहतात. आठवड्यातून एकदा उटणे, त्रिफळा चूर्ण किंवा बेसनपिठाने अंग घासून आंघोळ केल्यास त्वचेवरील अतिरिक्त ओलावा आणि स्निग्धता कमी होते.
पावसाळ्यात पायांची विशेष काळजी घ्यावी
पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनचा (चिखल्यांचा) धोका जास्त असतो. त्यामुळे बाहेरून आल्यावर पाय कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन पूर्णपणे कोरडे करावेत.
पावसाळ्यात पचनसंस्था नाजूक असल्याने, आहारात नवीन धान्याऐवजी जुने धान्य (उदा. जुना तांदूळ, जुना गहू) वापरणे पचनास जास्त हलके आणि फायदेशीर ठरते.
आठवड्यातून किमान दोनदा घरात कडुलिंबाची पाने, कापूर, ओवा किंवा राळ यांची धुरी (धूपन) करावी. यामुळे हवा शुद्ध होते, ओलावा कमी होतो आणि डास व जंतूंचा नाश होतो.
आयुर्वेदात प्रत्येक ऋतूनुसार शरीराची शुद्धी करण्यासाठी पंचकर्म सांगितले आहे. पावसाळ्यात वातदोषाचा प्रकोप सर्वांत जास्त असतो आणि या प्रकुपित वाताला मुळापासून शांत करण्यासाठी बस्ती हे सर्वांत श्रेष्ठ कर्म (उपचार) मानले जाते. आयुर्वेदात बस्तीला अर्धी चिकित्सा म्हटले आहे.
वातदोषाचे शरीरातील मुख्य घर म्हणजे आपले पक्वाशय (मोठे आतडे). पावसाळ्यात वाढलेला वात याच ठिकाणाहून संपूर्ण शरीरात पसरतो आणि हाडांमध्ये, सांध्यांमध्ये जाऊन सांधेदुखी, कंबरदुखी सुरू करतो. बस्ती हा उपचार थेट मोठ्या आतड्यावर काम करतो आणि वाढलेल्या वातदोषाला शरीराबाहेर टाकून शरीराला मुळापासून निरोगी बनवतो.
बस्ती कर्माचे अनेक फायदे आहेत. सांधेदुखी, मानदुखी, कंबरदुखी, मणक्याचे आजार किंवा साइटिका (डलळरींळलर) यांसारख्या वातविकारांमध्ये बस्ती अत्यंत प्रभावी ठरते.
बस्तीमुळे आतड्यांची कार्यक्षमता सुधारते, गॅस, बद्धकोष्ठता (उेपीींळरिींळेप) आणि अपचनाचा त्रास कायमचा दूर होतो. शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर काढण्यासाठी बस्ती उत्तम मार्ग आहे. वात कमी झाल्यामुळे झोप शांत लागते, ताणतणाव कमी होतो आणि त्वचेचा कोरडेपणा जाऊन एक नैसर्गिक चमक येते.
केवळ आजारी व्यक्तींनीच नाही, तर पूर्णपणे निरोगी व्यक्तींनीही पावसाळ्यात आपले आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आणि भविष्यातील वातविकार टाळण्यासाठी आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या सल्ल्याने बस्ती कर्म नक्की करवून घ्यावे.
निसर्गाच्या या सुंदर ऋतूचा मनसोक्त आनंद घ्या, पण आरोग्याला आयुर्वेदाची जोड देऊन!

पालकांनी करायचे उपाय
दिनचर्या तयार करा. रोज सकाळपासून रात्रीपर्यंत काय करायचे याचे वेळापत्रक तयार करून ते अमलात आणण्यासाठी मुलाला प्रोत्साहित करा.
वस्तूंची मांडणी करा. रोजच्या वापरातील सामान आणि खेळणी यांची जगच्या जागी ठेवण्याची सवय करा.
लक्ष विचलित करणार्‍या गोष्टींचे व्यवस्थापन करा. टीव्ही बंद करा, आवाज कमी करा. जेव्हा मुलाने एकाग्र होणे अपेक्षित आहे तेव्हा त्या कामासाठी स्वच्छ जागा द्या.
पर्याय मर्यादित ठेवा. एखादी गोष्ट जमत नाही असे वाटले तर त्यासाठीचे पर्याय जास्त नको.
स्पष्ट आणि नेमके बोला. सूचना करताना सोप्या, स्पष्ट आणि छोट्या वाक्यांचा वापर करा.
कामाचे नियोजन करताना मदत करा. गुंतागुंतीचे काम करताना ते छोट्या छोट्या टप्प्यात विभागून द्या. कामाचा तणाव कमी करण्यासाठी दोन कामांत छोटा ब्रेक घ्या.
प्रभावी शिस्त लावा. अयोग्य वर्तनासाठी मोठ्या आवाजात ओरडणे किंवा फटके मारणे असे न करता, सकारात्मक मार्गाचा वापर करा. चांगल्या वर्तनासाठी कौतुक करावे.
सकारात्मक संधी तयार करा. एखाद्या कामात मुलाची कामगिरी चांगली असेल किंवा एखादा खेळ चांगला जमत असेल तर त्यासाठी प्रोत्साहन द्या. त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो.
निरोगी जीवनशैली अमलात आणा. पुरेशी झोप, पोषक आहार आणि भरपूर शारीरिक कार्य यामुळे आरोग्य चांगले राहते.
मानसिक आरोग्य सांभाळा. योग्य शब्दांत स्तुती करा. संवाद वाढावा. बक्षीस आणि शिक्षा यांचा योग्य समतोल साधला तर अपेक्षित बदल नक्कीच बघायला मिळतात.
प्रत्येक मूल आणि त्याचे आरोग्य हे पालकाच्या खूप जिव्हाळ्याचे विषय. पण आपण स्वतः खूप घाबरून न जाता, डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि सकारात्मक वृत्तीने आपल्या पाल्याला हे उपाय केले तर तुम्हाला खूप फायदा होणार आहे.

Monsoon and Ayurveda

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *